Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात मिळणार पीकविमा, 31 जुलैपर्यंत करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिकांचा विमा (Crop insurance) उतरविता येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेत ‘सर्वसमावेशक पीक ‘विमा योजना’ सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकापासून करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी येत्या ३१ जुलैपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत.

Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

केंद्रपुरस्कृत पंतप्रधान पीक विमा (Pik Vima Yojana) योजनेंतर्गत यंदाचा खरीप हंगाम (२०२३-२४) आणि आगामी रब्बी हंगामातील (२०२५- २६० पिकांसाठी ही सर्वसमावेशक पीक विमा योजना’ (कप अँड कॅप मॉडल ८० : ११०) राबविण्यास मंजुरी दिली आहेस. या विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विम्याचे संरक्षण मिळणार आहे. सध्या ही योजना केवळ अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. तो ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे. (Agriculture News)

या कारणांसाठी मिळणार विमा कवच (Pik Vima Yojana)

  • प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी/ लावणी / उगवण न होणे.
  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट, भूस्खलन, जलमय क्षेत्र, ढगफुटी, वीज कोसळणे).
  • हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (पुर, पावसातील खंड, दुष्काळ ) इत्यादीमुळे ५०% पेक्षा जास्त नुकसान झाल्यास.
  • काढणी पश्चात नुकसान (गारपीट, चक्रीवादळ व बिगर मोसमी पाऊस).
  • पिक पेरणी पासून काढणी कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट.

घरबसल्या Hello krushi ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज

शेतकरी मित्रांनो सरकार राबवत असलेल्या योजना या आपल्यासाठी अधिकच महत्वाच्या आहेत. या योजनांमुळे शेती व्यवसायात शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी मदत होते. यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi ॲप सर्च करा आणि इंस्टॉल करा. त्यानंतर या ॲपद्वारे आपल्याला हव्या असलेल्या योजनांची माहिती मिळू शकते. तसेच हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही योजनांना अर्ज करून लाभ मिळवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागत नाही. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi डाउनलोड करा.

या पिकांचा होणार समावेश

तृणधान्य व कडधान्य पिकांसाठी खरीप हंगामात भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर आणि मका.

रब्बी हंगामात गहू, जिरायती रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात.

गळीत धान्यांसाठी खरिपात भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन.
रब्बी हंगामात उन्हाळी भुईमूग.

नगदी पिकांसाठी खरीप हंगामात कापूस, खरीप कांदा. रब्बी हंगामात रब्बी कांदा या पिकासाठी विमा योजना आहे.

ई-पीक पाहणीत नोंदविलेले क्षेत्र आणि प्रत्यक्षातील क्षेत्र यांत तफावत नसली पाहिजे. तसे आढळल्यास ई-पीक पाहणीतील क्षेत्र गृहीत धरले जाणार आहे.

विमा घेण्यासाठी शेतकरी पीक विमा पोर्टल, सामुदायिक सुविधा केंद्र किंवा बँकेत आपला अर्ज सादर करावेत.

error: Content is protected !!