Pik Vima Yojana : पीक विम्याच्या अर्जाची स्थिती घरबसल्या समजणार; एका कॉलवर सर्व माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करत असताना शेतकऱ्यांना (Pik Vima Yojana) अनेक संकटांना सामोरे जावे लागते. दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून संरक्षण दिले जाते. मात्र या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर पीक विम्याची रक्कम मिळवण्यासह अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी, शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाबाबत सांगणारे कोणीच नसते. हीच अडचण लक्षात घेऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून पुढील आठवड्यात देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेसाठीचा (Pik Vima Yojana) एक हेल्पलाईन नंबर जारी केला जाणार आहे.

छत्तीसगडमध्ये चाचणी यशस्वी (Pik Vima Yojana Status On One Call)

केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून पीक विमा योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यासांठी 14447 हा टोल फ्री क्रमांक जारी केला जाणार आहे. या क्रमांकावर कॉल करून, देशातील कोणत्याही भागातील शेतकऱ्यांना एका कॉलवर आपल्या पीक विम्याच्या दाव्याची स्थिती जाणून घेता येणार आहे. छत्तीसगड या राज्यामध्ये 14447 या टोल फ्री क्रमांकाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, त्यानंतर आता पुढील आठवड्यात हा क्रमांक देशभरातील शेतकऱ्यांसाठी लाँच केला जाणार आहे. दरम्यान, आतापर्यंत देशातील जवळपास 37 कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. असेही केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

कसे होणार कार्यान्वन

शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भात अडचण असल्यास ते 14447 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकणार आहे. कॉल केल्यानंतर शेतकऱ्यांना अर्जाच्या वेळी जमा केलेली कागदपत्रांमधील माहिती आणि पीक नुकसानीबद्दल माहिती द्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांना तुमची तक्रार दाखल झाल्याचा मेसेज फोनवर येईल. त्यानंतर शेतकरी कॉलवर घरबसल्या पीक विम्याच्या दाव्याबाबत सर्व माहिती मिळवू शकणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या तक्रारींचे समाधान झाले नाही तर पुन्हा फॉलोअप देखील घेता येणार आहे. फॉलोअप घेतेवेळी शेतकऱ्यांना फक्त त्यांना आलेल्या मेसेजमधील तक्रार क्रमांक सांगावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना पीक विम्याबाबत सर्व मिळू शकणार आहे.

error: Content is protected !!