Plastic Mulching Subsidy: राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: तण नियंत्रण, (Plastic Mulching Subsidy) जमिनीत पाणी टिकवून ठेवणे, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळणे, जमिनीची धूप रोखणे अशा अनेक कारणांमुळे शेतकरी त्यांच्या शेतात प्लास्टिक मल्चिंगचा (Mulching) वापर करायला लागले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना (Plastic Mulching Subsidy) सुरु करण्यात आलेली आहे. जाणून घेऊ या योजनेबद्दल.

किती अनुदान मिळणार? (Plastic Mulching Subsidy)

  • अनुदान हे सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति हेक्‍टर रुपये 32,000 असून या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 16,000 रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे कमाल दोन हेक्‍टर क्षेत्र मर्यादेपर्यंतच अनुदान देय आहे.
  • जर डोंगराळ क्षेत्र असेल, तर प्रति हेक्‍टर हे 36800/- रुपये मापदंड असणार आहे.या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 18,400/- रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे दोन हेक्‍टर क्षेत्र मर्यादितसाठी अनुदान देय असणार आहे.

प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेत कोण सहभागी होऊ शकतात?  

  • शेतकरी
  • बचत गट
  • शेतकरी उत्पादक कंपनी
  • शेतकरी समूह
  • सहकारी संस्था या योजनेमध्ये सहभागी होऊन अर्थसहाय्य घेऊ शकतात.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्डची छायाप्रत
  • आधार संलग्न असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स
  • 7/12 उतारा
  • 8-अ प्रमाणपत्र

विविध पिकांकरिता वापरायची मल्चिंग फिल्म

  • ज्या पिकांना 11 ते 12  महिने कालावधी लागतो. म्हणजे उदाहरणार्थ पपई यांसारख्या फळपिकांना 50 मायक्रोन जाडीची यु व्ही प्लास्टिक फिल्म वापरली जाते.
  • 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत येणाऱ्या पिकांसाठी म्हणजेच उदाहरणार्थ भाजीपाला, स्ट्रॉबेरी इत्यादींसाठी 25 मायक्रोन जाडीची युवी स्टॅबिलायझर फिल्म वापरली जाते.
  • जास्त कालावधी घेणारी पिके म्हणजेच 12 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी घेणाऱ्या सर्व पिकांसाठी 100 किंवा 200 मायक्रॉन जाडीची यु व्ही स्टॅबिलायझर प्लास्टिक फिल्म वापरली जाते.

या योजनेच्या (Plastic Mulching Subsidy) अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, यांच्याशी संपर्क करावा.

error: Content is protected !!