PM Kisan : पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता पाहिजे? या 3 गोष्टी बंधनकारक, अन्यथा पैसे मिळणार नाहीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे, सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पीएम-किसानचा 14 वा हप्ता 27 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. शेतकरी आता पंधराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात 2.50 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही Hello Krushi मोबाईल अँपद्वारे अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन सर्वात अगोदर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्यावे लागेल. अँप डाउनलोड केल्यानंतर सरकारी योजना या विभागात जाऊन तुम्हाला मोबाईलवरून खालील ३ गोष्टींची पूर्तता करावयाची आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM किसान सन्मान निधी) चा पुढील हप्ता मिळविण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी या 3 गोष्टी नक्कीच कराव्यात.

१) तुमच्या जमिनीची कागदपत्रे अपलोड करा.
२) सक्रिय बँक खात्याशी तुमचा आधार लिंक करा.
३) तुमचे ई-केवायसी पूर्ण करा.

हेल्पलाइन क्रमांक
पीएम-किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी अधिकृत हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा टोल फ्री क्रमांक 1800115526 वर संपर्क साधा.

error: Content is protected !!