PM Kisan : जर 12वा हप्ता अद्याप खात्यात आला नसेल, तर येथे तपासा डिटेल्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा 12वा हप्ता जारी केला. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000-2000 रुपये गेले. विशेष बाब म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 2000-2000 रुपयांच्या स्वरूपात 16,000 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत.

खात्यात किती रक्कम जमा झाली याची माहिती शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे मिळाली असती. ज्या शेतकर्‍यांना अद्याप रक्कम जमा झाल्याचा मेसेज आला नसेल, तर ते त्यांचे खाते तपासून (PM Kisan) माहिती घेऊ शकतात. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

१) खात्यात पैसे आले आहेत की नाही याची माहिती मिळविण्यासाठी, शेतकऱ्यांना प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.

२)येथे तुम्हाला उजव्या बाजूला Farmers Corner पर्याय दिसेल.

३)त्यानंतर त्या विभागात जाऊन Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

४)नवीन पेजवर लाभार्थीला आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांकाचा पर्याय निवडावा लागेल. या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता. (PM Kisan)

५)त्यानंतर Get Data वर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर, लाभार्थीच्या सर्व हप्त्यांची स्थिती उघड होईल.

६)तुम्हाला FTO is generated and Payment confirmation is pending असे दिसल्यास याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया केली जात आहे.

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले आहे आणि त्यानंतरही त्यांना हप्ता मिळाला नाही, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या क्रमांकांवर फोन करून माहिती मिळवू शकता.

पीएम किसान लँडलाइन क्रमांक- 011—23381092, 23382401

पीएम किसानची नवीन हेल्पलाइन- 011-24300606

पीएम किसान टोल फ्री क्रमांक- 18001155266

पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक- 155261

पीएम किसानची दुसरी हेल्पलाइन आहे- 0120-6025109

error: Content is protected !!