PM Kisan List : ‘या’ सोप्या पद्धतीने तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का ते तपासा, अन्यथा अडकू शकतो 15 वा हप्ता; फॉलोअ करा स्टेप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan List : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी, शेतकरी अधिकृत साइटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करू शकतात. केद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यातील सर्वात मोठी योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रति वर्षी ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ महिन्यांच्या अंतराने पाठवली जाते. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १४ हप्ते पाठवण्यात आले आहेत. यावेळी १५ व्या हप्त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही pmkisan.gov.in या अधिकृत साइटला भेट देऊन नोंदणी करू शकता.

लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे पहाल?

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर ओपन करून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप Install करा.
  • आता हॅलो कृषी अँप ओपन करून सरकारी योजना विभागावर जा अन पीएम किसान वर क्लिक करा.
  • आता होमपेजवरील फार्मर्स कॉर्नर विभागात जा.
  • यानंतर लाभार्थी यादीवर क्लिक करा.
  • मग शेतकरी बांधवांनो तुमच्या राज्याचे, जिल्ह्याचे, तहसीलचे, ब्लॉकचे आणि गावाचे नाव टाका.
  • यानंतर Get Report वर क्लिक करा
  • त्यानंतर यादीत तुमचे नाव तपासा.

यामुळे पुढील हप्ता अडकू शकतो

15 वा हप्ता घ्यायचा असेल तर शेतकरी बांधवांनी अर्ज भरताना कोणतीही चूक करू नये. त्यांनी नाव बरोबर टाकावे, आधार क्रमांकाचे अंक तपासावेत, पत्ता बरोबर ठेवावा. याशिवाय इतर कोणतीही चूक करू नका.

अधिक माहितीसाठी संपर्क

पीएम किसान योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी शेतकरी [email protected] वर ईमेल करू शकतात. याशिवाय, ते पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर – 155261, 1800115526 किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकतात.

error: Content is protected !!