PM Kisan Mandhan Yojana: पीएम किसान मानधन योजना; महिन्याला 55 रुपये जमा करा, 3000 रुपये पेन्शन मिळवा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकार शेतकर्‍यांसाठी (PM Kisan Mandhan Yojana) वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यातीलच एक योजना आहे ‘पीएम किसान मानधन योजना’ (PM Kisan Mandhan Yojana).

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा फक्त 55 रुपये भरायचे आहेत. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन (Pension) म्हणून मिळतील. सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देणं  हाच या योजनांचा उद्देश आहे. 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना असून अल्पभूधारक शेतकरी (Small Farmers) या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात.

पीएम किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्तम अशी योजना आहे. वयाची 60 वर्ष झाल्यानंतर अनेक शेतकरी शेती करण्यास सक्षम राहत नाहीत, त्यामुळं त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागतं. अशा स्थितीत शेतकऱ्यांना कोणावरही अवलंबून न राहण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही योजना महत्वाची आहे. या योजनेत शेतकऱ्यांना महिना 3000 रुपयांची पेन्शन दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

55 रुपयापासून 200 रुपयांपर्यंत प्रीमियम (PM Kisan Mandhan Yojana)

केंद्र सरकारनं 2019 मध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरु केली होती. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मिळावा हाच या योजनेच्या मागचा उद्देश होता. 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यानुसार तुम्हाला या योजनेत प्रिमीयम भरावे लागतात. ज्याची किंमत 55 रुपयापासून 200 रुपयांपर्यंत आहे. त्यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला महिना 3000 रुपयांची पेन्शन मिळते. दरम्यान, कोणत्याही कारणाने संबंधीत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला निम्मी पेन्शन म्हणजे 1500 रुपये मिळतात.

आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळखपत्र
  • वयाचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खाते पासबुक

कसा घ्यायचा योजनेचा लाभ? (PM Kisan Mandhan Yojana)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://labour.gov.in/pmsym या वेबसाईटला भेट द्या. या साईटवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ओटीपी जनरेट करावा लागेल. ओटीपी टाकून झाल्यावर अर्ज सबमीट करावा. यानंतर तुमची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल.

error: Content is protected !!