PM Kisan Scheme : पीएम किसानचा 16 वा हप्ता कधी मिळणार? पहा…एका क्लिकवर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर रोजी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा’ (PM Kisan Scheme) 15 वा हप्ता शेतकऱ्यांचा खात्यात जमा केला. त्यानंतर आता देशभरातील शेतकरी 16 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत (PM Kisan Scheme) आहेत. मात्र शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून, नवीन वर्षात फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात शेतकऱ्यांना 16 वा हप्ता दिला जाऊ शकतो. मात्र, असे असले तरी सरकारकडून ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने’च्या 16 व्या हप्ताबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक चार महिन्याला तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे 15 हफ्ते मिळाले आहेत. 15 व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना 18 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. 8 कोटीहुन अधिक शेतकऱ्यांनी 15 व्या हप्त्याचा फायदा घेतला आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 14 हप्त्यांसाठी एकूण 2.62 लाख कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळण्यास मोठा फायदा झाला आहे.

वर्ष 2023 मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या तारीख अशा पद्धतीने होत्या.

  • 13 वा हप्ता – 27 फेब्रुवारी 2023
  • 14 वा हप्ता – 27 जुलै 2023
  • 15 वा हप्ता – 15 नोव्हेंबर 2023

अशी करा 16 व्या हप्त्यासाठी नोंदणी (PM Kisan Scheme 16th Installment)

  • ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने’चा 16 वा हप्ता मिळवण्यासाठी सरकारच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जा.
  • ‘फार्मर कॉर्नर’ वर क्लिक करा.
  • ‘नवीन फॉर्म नोंदणी’ वर क्लिक करा. आधार क्रमांक टाकून कैप्चा भरा.
  • मागितलेली सर्व माहिती भरा. ‘येस’ बटनावर क्लिक करा.
  • पीएम शेतकरी सन्मान निधीच्या 2023 मध्ये मागितलेली माहिती भरा.
  • ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. आणि प्रिंट घ्या.

अशी चेक करा 15 व्या हप्त्याची स्थिती

  • जे शेतकरी आपल्या 15 व्या हप्त्याची स्थिती चेक करू इच्छिता. त्यांनी सर्वप्रथम पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या https://pmkisan.gov.in अधिकृत वेबसाईटवर जावे.
  • ‘फार्मर कॉर्नर’ वर क्लिक करा. त्यानंतर Beneficiary Status वर क्लिक करा.
  • त्यानंतर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून कैप्चा कोड भरा.
  • ‘गेट स्टेटस’ वर क्लिक करा.

शेतकऱ्यांनी येथे संपर्क साधावा

पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधू शकता – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092. इथेही तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

error: Content is protected !!