हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Scheme) सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. यासोबतच आता देशभरातील शेतकरी 16 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, एकाच घरातील वडील आणि मुलगा दोघेही पीएम किसान योजनेचा (PM Kisan Scheme) लाभ घेऊ शकतात का? याबाबत काय नियम आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे नियम? (PM Kisan Scheme For Farmers)
तुम्हालाही अनेकदा हा प्रश्न पडला असेल की आपल्या घरात वडील आणि मुलगा असा दोघांनाही पीएम किसानचा (PM Kisan Scheme) हप्ता भेटेल का? पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, एका कुटुंबातील फक्त एकच सदस्य पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतो. एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला तर अशा वेळेस त्यांचा अर्ज रद्द केला जाईल. अशा परिस्थितीत वडील आणि मुलगा दोघांनाही पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही.
11 कोटी शेतकऱ्यांना फायदा
विशेष म्हणजे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक असते. अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी पीएम किसानचा 15 वा हप्ता जारी केला होता. या 15 व्या हप्त्याचा 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत 15 हप्ते जारी केले असून, त्यासाठी आतापर्यंत एकूण 2.81 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच या योजनेचा आतापर्यत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे.
पीएम किसान हेल्पलाइन नंबर
पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) नोंदणीबाबत तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. शेतकरी 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. याशिवाय शेतकरी [email protected] या ईमेल आयडीवर मेल करू शकतात.