हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. तीन टप्प्यांमध्ये चार महिन्याच्या अंतराने ही आर्थिक मदत गरजू शेतकऱ्यांना दिली जाते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या योजनेद्वारे (PM Kisan Scheme) अनेक ठिकाणी खोटी माहिती दाखवून घोटाळा होत असल्याचे समोर येत आहे. असाच काहीसा प्रकार बिहार राज्यातील मुजफ्फरपूर येथे समोर आला आहे.
बिहारच्या मुजफ्फरपूर येथे जवळपास 11 हजार 600 लोकांनी चुकीच्या पद्धतीने आवेदन करून, जवळपास 18 कोटी रुपये योजनेद्वारे (PM Kisan Scheme) मिळवल्याचे समोर आले आहे. स्थानिक प्रसासनाने या 11 हजार 600 जणांविरोधात कारवाई सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या सर्वांना प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीशीमध्ये त्यांना सरकारची रक्कम वापस करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा हक्काचा निधी अन्य कोणी लाटत असल्याने योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहे.
22 लाखांचा निधी परत (PM Kisan Scheme Fraud In Bihar)
दरम्यान, या 11 हजार 600 जणांकडून आतापर्यंत 22 लाख रुपयांचा निधी वापस मिळाला आहे. मात्र रक्कम वापस न करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना बँक अकाऊंट सील करण्यासोबतच त्यांच्यावर सरकारी केस केली जाणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधितांना योजनेचे पैसे तर मिळाले. मात्र जेव्हा पंतप्रधान कार्यालयाकडून आधार जोडणीसह अन्य बाबींची पडताळणी करण्यात आली, तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला आहे. यात काही जण इन्कम टॅक्सचा भरणा करत असल्याचे समोर आले. त्यामुळे आता या सर्व 11 हजार 600 जणांना प्रशासनाने रक्कम वापस करण्यास सांगितले आहे.