PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी खात्यावर जमा होणार 2000 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी आणलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सर्वात लोकप्रिय ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत केंद्र सरकारकडून या योजनेचे १३ हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता शेतकरी १४ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असून येत्या २८ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा गेले जातील. यावेळी तब्बल ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे जमा होणार आहेत.

याबाबत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २८ जुलै रोजी नरेंद्र मोदी देशभरातील ८.५ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) १४ वा हप्ता जारी करतील.  पंतप्रधान मोदी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT द्वारे १८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत. यावेळी प्रत्येक  शेतकऱ्याच्या खात्यावर २ हजार जमा होतील.

२७ फेब्रुवारी रोजी मिळाला होता १३ वा हप्ता – (PM Kisan Yojana)

यापूर्वी शेतकरी योजनेचा १३ वा हप्ता कर्नाटकमधून २७ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला होता. त्यानंतर आता पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता २८ जुलेैला राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातून जारी करण्यात येईल. यासाठी गावात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी स्वतः बटण दाबून शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेचे पैसे पाठवतील. या कार्यक्रमात लाखो शेतकरी सहभागी होणार आहेत.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही पंतप्रधान किसान सन्मान योजेनचा लाभ घ्यायचा असेल तर आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून कोणत्याही सरकारी योजनेसाठी थेट अर्ज करून आर्थिक लाभ घेता येतोय. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रूपया सुद्धा खर्च करण्याची गरज नाही. याशिवाय हॅलो कृषी मध्ये तुम्हाला जमीन मोजणी, सातबारा उतारा, रोजचा बाजारभाव, पशु- खरेदी विक्री, हवामान अंदाज यांसारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

दरम्यान, पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) हि केंद्रातील मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत सरकार सर्व पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये देत आहे. सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना देत आहे.  हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जातात.  देशातील शेतकऱ्यांना शेती करत असताना आर्थिक मदत व्हावी यासाठी मोदी सरकारने उचललेले हे मोठं पाऊल आहे.

error: Content is protected !!