PM Kisan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना नाही मिळणार 14 व्या हप्त्याचे पैसे; नेमकी अडचण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 28 जुलै ला 14वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी २००० रुपयांचे एकूण 13 हप्ते जमा झालेले आहे. आता राजस्थान येथील जालोर या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमा वेळी पीएम नरेंद्र मोदी 14व्या हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतील. शेतकरी मोठ्या आशेने २००० रुपयांची वाट बघत आहे परंतु काही शेतकऱ्यांना मात्र या हप्त्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

PM Kisan चा १४ वा हप्ता मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही १४ वा हप्ता

भुलेखांच्या पडताळणीत जमिनीच्या नोंदी चुकीच्या आढळल्यास या योजनेच्या लाभार्थी यादीतून शेतकऱ्यांना काढून टाकले जाईल. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता मिळणार नाही. तसेच सरकारकडून बऱ्याच दिवसांपासून ई-केवायसी करण्याबाबत माहिती देण्यात आलेली होती. त्यानुसार ई केवायसी अपडेट न केलेल्यांना देखील मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. याशिवाय, जर तुम्ही शेती सोबतच कोणत्याही संवैधानिक पदावर काम करत असाल, तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारचे विद्यमान किंवा निवृत्त कर्मचारी असाल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळू शकणार नाही

असा मिळवा योजनेचा लाभ –

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळवण्यासाठी आजच मोबाईल मध्ये Hello Krushi अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही पीएम किसान सोबतच कोणत्याही योजनेला थेट अर्ज करून आर्थिक लाभ मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. याशिवाय हॅलो कृषी मध्ये जमीन मोजणी, सातबारा उतारा, रोजच्या सर्व पिकांचा बाजारभाव, शेतीविषयक सल्ल्ले, हवामान अंदाज त्यांसारख्या सर्व सुविधा अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर Hello Krushi डाउनलोड करा आणि सर्व सुविधांचा लाभ घ्या.

मोदी सरकारची महत्वकांक्षी योजना – (PM Kisan Yojana)

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान योजना आणली होती. त्या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा करण्यात येतात. तीन टप्प्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाते. आतापर्यंत 13 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना आर्थिक मदत व्हावी हाच या योजनेचा मुख्य हेतू आहे.

पैसे जमा झाले कि नाही ते असं चेक करा –

किसान पीएम योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं नाव लिस्ट मध्ये आहे की नाही हे चेक करू शकता. Pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन होम पेजवर फार्मर्स कॉर्नर वर जा. त्यानंतर दुसऱ्या पेज वर दिलेली माहिती भरा. या प्रोसेस नंतर तुम्हाला समजेल की 14 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेले आहे की नाही. या वेबसाईट ऐवजी तुम्ही टोल फ्री नंबर वर कॉल करून देखील याची माहिती घेऊ शकतात. तुम्ही 14 व्या हप्त्याचे लाभार्थी आहे की नाही हे पाहण्यासाठी 155261 किंवा 1800115526 या टोल फ्री नंबर वर संपर्क करू शकतात. याशिवाय 011-23381092 या नंबर वर देखील संपर्क करू शकतात.

error: Content is protected !!