PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. प्रत्येकी २००० रुपयांच्या अशा एकूण एकूण ३ टप्प्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी अल्प भुधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतोय. आतापर्यंत २००० रुपयांचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाले असून शेतकरी आपल्या खात्यात 14वा हप्ता कधी येईल याची वाट बघत आहेत.

पण आता शेतकऱ्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. माध्यमात प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्यांनुसार, एका आठवड्याभरात पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतीसाठी काही आर्थिक मदत लागणार असेल तर या पैशाचा वापर शेतकरी बांधव करू शकणार आहेत.

13वा हप्ता न आलेल्यासाठी काय करावं

पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचं उघड होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात तेराव्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत. काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या खात्यात पैसे येत नसल्याचं लक्षात आलं. त्या शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्यापूर्वी त्यांच्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करा, असे सांगण्यात आले आहे.

असा मिळवा 14वा हप्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता मिळवण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन तुमच्या मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. यामधील कृषी योजना या विभागावर क्लिक करा. यामध्ये तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी थेट अर्ज करू शकता. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. हॅलो कृषी मध्ये पीएम किसान योजनेशिवाय शेतकऱ्यांशी संबंधित अन्य सरकारी योजनांना सुद्धा थेट अर्ज करून तुम्ही आर्थिक लाभ मिळवू शकता. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप डाउनलोड करा.

पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता न आलेल्याला शेतकऱ्यांसाठी देशभरात शिबिरे आयोजित केली जात आहेत, त्यांच्या समस्या सोडवण्यात येत आहे. जर तुमच्याही खात्यात काही अडचणी मुळे प्रोब्लेम येत असेल तर तुमच्या जवळच्या कॅम्पमध्ये जाऊन तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करा. शेतकऱ्यांना 13वा हप्ता अजुनही मिळालेला नाही, त्यांना 14वा हप्ता मिळण्यातही अडचण येणार आहे.

error: Content is protected !!