PM Kisan Yojana : केंद्र सरकार (Central Govt) शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक योजना राबवत आहे. सरकारच्या या योजनांचा शेतकऱ्यांना देखील लाभ होतो. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते. दरम्यान, सरकारच्या PM किसान सम्मान निधी योजने (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. या योजनेचे अत्तापर्यंत १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
PM Kisan Yojana चा हप्ता मिळवण्यासाठी आजच करा हे काम
शेतकरी मित्रांनो तुम्हाला सरकारच्या योजनेचे पैसे खात्यावर मिळवायचे असतील तर तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप असणे अतिशय गरजेचे आहे. इथे तुम्हाला सरकारी योजनेबाबत सखोल माहिती देण्यात येते. तसेच सरकारी पातळीवर काहीही बदल झाला अन तुमचं कागदपत्र अपडेट करायचे असल्यास इथे तुम्हाला कळवण्यात येते. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या अँप वरून सोप्प्या पद्धतीने Online अर्ज करू शकता. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं नाव टाईप करून हे अँप इंस्टॉल करून घ्या.
PM किसान सम्मान निधी योजनेचे १३ हप्ते जमा झाले असून आता शेतकरी १४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता १४ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता १५ जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. PM Kisan Yojana
या शेतकऱ्यांना मिळणार नाही १४ वा हप्ता
बरेच शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या १४ व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची अजूनही ई-केवायसी झालेले नाही अशा शेतकऱ्यांना १४ वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या