PM Kisan Yojana : सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी बांधवांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याची प्रतीक्षा होती, ती आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला आहे. त्यामुळे दिवाळीच्या या काळात शेतकऱ्यांना सरकारकडून २००० रुपयांची भेट मिळाली आहे. यावेळी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. योजनेअंतर्गत सुमारे 18 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.

झारखंडमधील खुंटी येथे आयोजित कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटण दाबून हा हप्ता हस्तांतरित केला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आणि इतर आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून मदत दिली जाते. पंतप्रधान किसान संमन योजनेच्या माध्यमातून (PM Kisan Yojana) आत्तापर्यंत प्रत्येकी २००० रुपयांच्या माध्यमातून १४ हप्ते शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते आणि आता १५ वा हप्ताही शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तुम्हाला येथे मदत मिळेल

या योजनेशी संबंधित कोणतीही माहिती शेतकरी बांधवांना हवी असल्यास [email protected] वर ईमेल पाठवू शकता. याशिवाय हेल्पलाइन क्रमांक १५५२६१ किंवा आहे. तसेच 1800115526 किंवा 011-23381092 वर संपर्क करू शकता.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे हवे असतील तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून कोणत्याही सरकारी योजनांना तुम्ही घरबसल्या थेट अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च नाही. याशिवाय, सातबारा उतारा, रोजचा बाजारभाव, पशु खरेदी- विक्री, जमीन मोजणी यांसारख्या असंख्य सुविधा तुम्हाला हॅलो कृषी मध्ये अगदी मोफत मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

काय आहे योजना? PM Kisan Yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे जी देशातील सर्व शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करते. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकरी कुटुंबाला तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी ६,००० रुपये दिले जातात. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे, शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारणे, शेतकर्‍यांचे राहणीमान सुधारणे आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देणे हे या योजनेच्या उद्दिष्टाविषयी सांगितले. या योजनेद्वारे प्रत्येक शेतकरी कुटुंबाला तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी ६,००० रुपये मिळतात. पहिला हप्ता एप्रिल महिन्यात, दुसरा हप्ता जुलै महिन्यात आणि तिसरा हप्ता नोव्हेंबर महिन्यात दिला जातो.

error: Content is protected !!