PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत बदल; शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यास होणार मदत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवली जाते. मात्र आता राज्यपातळीवर या योजनेत थोडा बदल करण्यात आला आहे. सध्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजारांची मदत तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना प्रदान करण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्याद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेची रक्कम मिळवून देण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची (PM Kisan Yojana) नेमणूक केली जाणार आहे.

ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (PM Kisan Yojana 16th Installment)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) ही केंद्र सरकारची योजना (PM Kisan Yojana) असून, ती शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे. या उद्देशाने राबविण्यात येत आहे. या योजनेच्या निकषांप्रमाणे पात्र शेतकरी कुटुंबीयास रुपये दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे चार महिन्यांतून एकदा असे एकूण सहा हजार रुपये प्रति वर्ष आर्थिक लाभ दिला जातो. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी हे उपलब्ध होणारे सहा हजार रुपये भांडवल आणि गुंतवणुकीसाठी वापरतात येतात. मात्र आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हे पैसे वेळेत मिळवून देण्यासह त्यांच्या बँक खात्याची केवायसीची माहिती भरण्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नेमण्यात येत आहेत. त्याच्याकडून रखडलेल्या रकमेसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम ४५ दिवसांत करण्यात येणार आहे. सरकारकडून सांगितले जात आहे.

हे असतील नोडल अधिकारी

दरम्यान, शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान योजनेचे १५ हप्ते (PM Kisan Yojana) दिले गेले आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याची रक्कम बँक खात्यात जमा केली जाण्याची शक्यता आहे. मात्र आता या १६ व्या हप्त्याची रक्कम या नोडल अधिकाऱ्याच्या माध्यमातून बँक खात्यात जमा कली जाणार आहे. ग्रामस्तरीय नोडल अधिकारी म्हणून कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक, सामाईक सुविधा केंद्र, प्रगतिशील शेतकरी, एफपीओ, एफपीसी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. असे एका राज्य सरकारमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम विना अडथळ्याशिवाय मिळू शकणार आहे, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

error: Content is protected !!