PM Kisan Yojana : ‘या’ दिवशी मिळणार पीएम किसानचा 17 वा हप्ता; लवकर पूर्ण करा ही प्रक्रिया!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरु केली आहे. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उपलब्ध व्हावे. हा या योजनेचा उद्देश असून, आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचा देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा घेतला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांना योजनेचा 16 वा हप्ता जारी करण्यात आला होता. तर आता 17 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. हा 17 वा हप्ता शेतकऱ्यांना जून महिन्याच्या शेवटी किंवा मग जुलै महिन्याच्या (PM Kisan Yojana) सुरुवातीला दिला जाण्याची शक्यता आहे.

काय आहे ही योजना? (PM Kisan Yojana 17th Installment)

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक चार महिन्याला तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे 16 हफ्ते मिळाले आहेत. 16 व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. 9 कोटीहुन अधिक शेतकऱ्यांनी 16 व्या हप्त्याचा फायदा घेतला आहे. अशातच आता लवकरच शेतकऱ्यांना 17 वा हप्ता दिला जाणार आहे.

अशी करा 17 व्या हप्त्यासाठी नोंदणी

  • ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने’चा (PM Kisan Yojana) 17 वा हप्ता मिळवण्यासाठी सरकारच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जा.
  • ‘फार्मर कॉर्नर’ वर क्लिक करा.
  • ‘नवीन फॉर्म नोंदणी’ वर क्लिक करा. आधार क्रमांक टाकून कैप्चा भरा.
  • मागितलेली सर्व माहिती भरा. ‘येस’ बटनावर क्लिक करा.
  • पीएम शेतकरी सन्मान निधीच्या 2024 मध्ये मागितलेली माहिती भरा.
  • ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. आणि प्रिंट घ्या.

ई-केवायसी अनिवार्य

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याची रक्कम जून किंवा जुलै महिन्यात जारी केली जाऊ शकते. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, 17 व्या हप्त्याचा लाभ हा केवळ ई-केवायसी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. पीएम किसानच्या वेबसाइट जाऊन शेतकरी आपली पीएम किसान योजनेची नोंदणी आणि ई-केवायसी करू शकतात. किंवा मग तुमच्या जवळच्या डिजिटल सेवा केंद्रात जाऊन देखील तुम्ही पीएम किसान योजनेची ई-केवायसी करू शकतात.

error: Content is protected !!