PM Kisan Yojana : पीएम किसानच्या 17 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; करावी लागणार ‘या’ गोष्टींची पूर्तता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात यवतमाळ येथून देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 16 वा हप्ता जारी केला. मात्र, आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवरून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार शेतकऱ्यांना अटी आणि शर्तींची पूर्तता करण्याचे आवाहन केले जाते. अनेक शेतकऱ्यांकडून या अटींची पूर्तता केली जात नाही. मात्र, सरकारच्या निर्देशांनुसार शेतकऱ्यांनी पुढील 17 व्या हप्त्यासाठी नियमावलीचे पालन न केल्यास, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) पुढील हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट केले जात आहे.

17 वा हप्ता कोणाला मिळणार (PM Kisan Yojana 17th Installment)

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) एफएक्यू अनुसार, लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव संबंधित राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशांकडून अपलोड केले जातात. मात्र, आता सरकारांकडून अपलोड केलेले हे शेतकऱ्यांचे नाव पीएम किसानच्या पोर्टलवर मागील चार महिन्यातील अपडेटेड असणे अनिवार्य आहे. अर्थात एकदा नाव अपलोड केल्यानंतर शेतकरी केवळ तितक्याच कालावधीसाठी लाभ मिळवण्यास पात्र असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी नियमित हप्त्यांची नोंदणी केलेली असेल. तर त्यांना अन्य कोणत्याही कारणास्तव योजनेचा लाभ नाकारला गेला असेल. तरीही केवळ वेळेत नोंदणी केलेली असल्याने ते केव्हाही आपला हप्ता मिळवण्यास पात्र असणार आहे. असेही सरकारी पातळीवरून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधींनाही मिळणार लाभ

इतकेच नाही तर आता केंद्र सरकारने देशातील लोकप्रतिनिधी असलेल्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शेतकरी आहे, मात्र असा व्यक्ती जनतेचे प्रतिनिधित्व करत असेल. तर अशा व्यक्तींना पीएम किसान योजनेचा लाभ आतापर्यंत नाकारण्यात येत होता. मात्र आता यापुढे नगरपंचायत, पंचायत समिती किंवा स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अर्थात देशभरातील लाभधारकांना ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेचा लाभ वर्षातून तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. त्याचप्रमाणे आता लोकप्रतिधींना देखील पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

16 वा हप्ता मिळाला नाही?

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) 16 व्या हप्त्याचा लाभ मिळाला नसेल. अशा शेतकऱ्यांनी आपली योजनेसाठी नोंदणी केल्याची खात्री करावी. किंवा मग आपल्या आधारकार्डच्या माध्यमातून ई-केवाईसीची स्थिती चेक करावी. यासाठी शेतकऱ्यांनी https://pmkisan.gov.in या योजनेच्या संकेतस्थळावर आपली स्थिती चेक करावी. योजनेचा लाभ न मिळाल्यास शेतकरी तक्रार देखील करू शकतात. यासाठी ईमेल आयडी: [email protected]. आणि [email protected] किंवा पीएम-किसान हेल्पलाइन क्रमांक – 155261/011-24300606 पीएम किसान टोल फ्री क्रमांक 1800-115-526 उपलब्ध आहे.

error: Content is protected !!