PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेसाठी राज्यभरात मोहीम; शेतकऱ्यांना सुवर्णसंधी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) २००० हजार रुपयांचा १६ वा हप्ता लवकरच वितरित केला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली असून, २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना सरकारच्या कृषी विभागाकडे आपली पीएम किसान योजनेसाठीची (PM Kisan Yojana) ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून जारी करण्यात आली आहे.

काय आहे ‘ही’ मोहीम? (PM Kisan Yojana Campaign For EKYC)

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अद्याप नोंदणी केली नसेल. अशा शेतकऱ्यांना देखील या मोहिमेच्या माध्यमातून आपली नोंदणी करता येणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल. किंवा मग ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्यासोबत जोडलेले नसेल. अशा सर्व शेतकऱ्यांना आपली योजनेसाठीच्या १६ व्या हप्त्यासाठी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया करता येणार आहे. अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

1 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी

दरम्यान, यापूर्वी राज्य सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत नोंदणीसाठी मोहीम राबविण्यात आली होती. या ४५ दिवसांच्या कालावधीत राज्यातील एकूण १ लाख ४ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया आणि ३ लाख १ हजार शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली आहे. अशी माहितीही कृषी विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

सहभागासाठी शेतकऱ्यांना आवाहन

त्यानंतर आता पुन्हा केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मोहीम हाती घेतली असून, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे निर्देशही राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी कृषी विभागाला दिले आहेत. याशिवाय राज्यातील गाव पातळीवर ही मोहीम राबविली जाणार असल्याने, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!