PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेची ई-केवायसी घरबसल्या करा; फॉलो करा या स्टेप्स…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. यासोबतच 16 व्या हप्त्याची नोंदणीही सुरू झाली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना घरबसल्या ई-केवायसी कशी करायची हे माहित नसते. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या ई-केवायसी (PM Kisan Yojana) करण्याबात माहिती देणार आहोत.

तुम्हालाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) अधिकृत वेबसाइटला (pmkisan.gov.in) भेट देऊन नोंदणी करू शकता. सरकारने 15 व्या हप्त्यात सुमारे 8 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते. पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याच्या म्हणजेच 16 व्या हप्त्याच्या लाभार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. त्यामुळे आपण काही गोष्टी निश्चित करत आपला १६ वा हप्ता कन्फर्म करू शकता. त्यामुळे घरबसल्या ई-केवायसी करणे, नोंदणी दरम्यान अचूक माहिती भरणे गरजेचे असणार आहे.

घरबसल्या ई-केवायसी (PM Kisan Yojana Do e-KYC From Home)

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने जमीन पडताळणी आणि ई-केवायसी (PM Kisan Yojana) अनिवार्य केले आहे. कोणत्याही शेतकऱ्याने ई-केवायसी आणि जमीन पडताळणी केली नसेल तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे देशातील अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या 15 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. पीएम किसान पोर्टल किंवा सीएससी केंद्राला भेट देऊन शेतकरी सहजपणे केवायसी करू शकतात. किंवा घरबसल्या ई-केवायसी कशी करणार याबाबत सांगणार आहोत.

या आहेत ई-केवायसी करण्याच्या स्टेप्स

  • Online e-KYC करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या स्मार्ट फोनमध्ये Google Play Store मध्ये जावे लागेल. त्यात PM Kisan Go टाईप केल्यास तुम्हाला पीएम किसानचे अॅप मिळेल.
  • हे अॅप तुम्हाला Download आणि Install करावे लागेल.
  • हे अॅप उघडल्यानंतर तुम्हाला PM Kisan e-KYC by Face Authentication नावाचा डॅशबोर्ड दिसेल.
  • या ठिकाणी तुम्हाला Login ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल. ज्यावर PM Kisan e-KYC by Face Authentication लिहिलेले असेल.
  • या ठिकाणी विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. आणि त्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल.
  • यानंतर PM Kisan e-KYC by Face Authentication हा डॅशबोर्ड ओपन होईल.
  • या ठिकणी तुम्हाला e-KYC For Other Beneficiaries यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर PM Kisan e-KYC by Face Authentication चे नवीन पेज ओपन होईल.
  • याठिकाणी तुम्हांला तुमची माहिती भरून Proceed ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर पुन्हा PM Kisan e-KYC by Face Authentication चे पेज ओपन होईल.
  • या ठिकाणी तुम्हाला Scan Face ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आपला चेहरा स्कॅन करावा लागेल. चेहरा स्कॅन होताच तुमची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल. आणि तुम्हाला याबाबत मेसेज येईल.

पीएम किसान हेल्पलाइन नंबर

पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) नोंदणीबाबत तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. शेतकरी 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. याशिवाय शेतकरी [email protected] या ईमेल आयडीवर मेल करू शकतात.

error: Content is protected !!