PM Kisan Yojana : ‘या’ पाच गोष्टी आजच पूर्ण करा; अन्यथा पीएम किसानचा 16 वा हप्ता मिळणार नाही!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत (PM Kisan Yojana) देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना राबविली जात आहे. या योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच वितरित केला जाणार आहे. मात्र, तुम्ही या योजनेबाबत पाच गोष्टींची पूर्तता केली नसेल. तर तुम्हांला 2000 हजार रुपयांचा 16 वा हप्ता मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे आजच पुढील गोष्टींची पूर्तता करून, आपला येणारा 16 वा हप्ता फिक्स करा. योजनेतील गैर-व्यवहार कमी करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना वारंवार योजनेच्या (PM Kisan Yojana) अटींची पूर्तता करण्याचे आवाहन केले जात आहे.

‘या’ गोष्टी तात्काळ पूर्ण करा (PM Kisan Yojana For Farmers)

अनेक बनावट शेतकरी हे शेती नसतानाही या योजनेचा लाभ घेतात. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी (PM Kisan Yojana) काही अटींची पूर्तता करणे शेतकऱ्यांना सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे. परिणामी, तुम्ही या अटींची पूर्तता न केलयास या योजनेपासून वंचित राहू शकतात. यासाठी पुढील पाच गोष्टींची काळजी घ्या. प्रथम म्हणजे तुमच्या बँक खात्याची योग्य माहिती नोंदणी करताना भरा. माहिती चुकीची आढळळ्यास तुमचा 16 वा हप्ता थांबवला जाऊ शकतो. याशिवाय दुसरे म्हणजे एनपीसीआय अर्थात (नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया) मध्ये आधार लिंक करण्यात दिरंगाई करू नका. तिसरे म्हणजे आपल्या ई-मेलची चुकीची माहिती भरू नका. अन्यथा तुमचा 16 वा हप्ता रोकला जाऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टी टाळण्यासाठी योजनेसाठी ई-केवाईसीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा. तुम्ही अजूनपर्यंत पीएम किसान योजनेसाठी ई-केवाईसी प्रक्रिया केलेली नसेल तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन तात्काळ पूर्ण करून घ्या.

आधार लिंकची पडताळणी

शेतकरी आपला आधार क्रमांक लिंक आहे की नाही? किंवा पंतप्रधान किसान योजनेसाठीचे स्टेटस चेक करण्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहे. तुमचे आधार लिंक आहे की नाही? ई-केवाईसी अशी सर्व माहिती या संकेतस्थळावर तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध होईल.

कसे चेक कराल स्टेट्स?

  • pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा.
  • ‘फार्मर कॉर्नर’ वर क्लिक करून, त्यानंतर ‘लाभार्थी स्थिती’ या ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुमचा आधार क्रमांक, खाते नंबर, फोन नंबर टाका.
  • कॅप्चा भरा, ‘माहिती प्राप्त करा’ या ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची योजनेबाबतची सर्व माहिती समोर दिसेल.

error: Content is protected !!