हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना १४ वा हप्ता हा मे किंवा जून महिन्यात मिळणार आहे. दरवषी या योजनेच्या माध्यमातून प्रती वर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. या योजनेचा लाभ देशभरातील असंख्य शेतकरी घेताना दिसत आहेत. मात्र आता इथून पुढे या योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास शेतकऱ्यांना एक गोष्ट मात्र नक्की करावी लागेल. शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधारकार्डला जोडावे लागणार आहे, अन्यथा या योजनेचा लाभ मिळवणं अशक्य आहे. त्यामुळे सरकारकडून बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यात येत आहे.
बँक खाते हे आधारकार्डला जोडण्यासाठी प्रत्येक गावातील पोस्ट मास्टरकडून बँक खाते आधार कार्डला लिंक करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांसह आपल्या गावातील पोस्ट ऑफिसला भेट द्यावी. पोस्ट विभागाचे कर्मचारी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडावे. सदरचे अकाउंट हे ४८ तासात जोडले जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या राज्यात लाखोंहून अधिक जनतेची खाती आधारकार्डला लिंक नाहीत.
लाखोंच्या संख्येने आधारकार्ड बँक खात्यांना लिंक नाहीत
देशभरात १२ लाख लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थ्यांच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ होणार नाही. मात्र आधार जोडणी पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने सोपी आणि सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.