PM Kisan Yojana : राज्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही; धनंजय मुंडे यांची ग्वाही!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही. यासाठी राज्य सरकारचा कृषी विभागाकडून (PM Kisan Yojana) काम सुरु आहे. अशी माहिती आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना दिली आहे. यासंदर्भांत काँग्रेस आमदार नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नास उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी ही माहिती सभागृहाला दिली आहे.

कृषी विभागाची मोहीम (PM Kisan Yojana No Farmer Deprived)

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी (PM Kisan Yojana) राज्यातील जवळपास 96 लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजनेची सुरुवात केल्यानंतर केंद्र सरकारच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती ठरवण्यात आली होती. मात्र ई-केवायसी पूर्ण नसणे, बँक खाते आधारसोबत जोडलेले नसणे, अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने यापैकी 12 ते 13 लाख शेतकरी या योजनांच्या लाभापासून वंचित राहिले होते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आली. मात्र, आता कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कृषी, महसूल व भूमिअभिलेख आदी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत जात आहे. ज्याअंतर्गत आतापर्यंत राज्यातील जवळपास 6 लाख शेतकऱ्यांनी सर्व अटींची पूर्तता केली आहे.

पटोले, थोरातांचा प्रश्न

त्याचप्रमाणे जे शेतकरी अल्पभूधारक किंवा अन्य कारणांनी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांचे नाव योजनेतून कमी करण्याची देखील कार्यवाही केली जात आहे. मात्र या कार्यवाहीचा परिणाम एकाही पात्र शेतकऱ्यावर होऊ देणार नाही, अशी खात्रीही धनंजय मुंडे यांनी उपस्थित प्रश्नाच्या निमित्ताने सभागृहाला दिली आहे. या विषयावर काँग्रेस आमदार नानाभाऊ पटोले, आमदार बाळासाहेब थोरात आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

error: Content is protected !!