PM Kisan Yojana : मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार सर्वात मोठं गिफ्ट; या योजनेत होणार बदल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून केंद्रातील मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेची (PM Kisan Yojana) घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यामातून दरवर्षी ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. हे पैसे दर ४ महिन्यांनी प्रत्येकी २००० रुपयांच्या हप्त्याच्या रूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात. आता मोदी सरकार या योजनेतील रकमेत वाढ करण्याची शक्यता आहे. त्यानुसार ६००० ऐवजी सरकार ८००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाऊ शकतात. हे पैसे ४ हप्त्यात दिले जाऊ शकतात.

आगामी ५ राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची व्होट बँक आणि त्यांचं महत्व पाहता मोदी सरकार कडून पीएम किसान योजनेची (PM Kisan Yojana) रक्कम वाढवली जाऊ शकते, असे मानले जात आहे. केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सरकारने असा निर्णय घेतल्यास देशभरातील शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात हे सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे.

शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजचे मोबाईल मध्ये Hello Krushi अँप डाउनलोड करा. यातील कृषी योजना विभागावर क्लीक करताच तुम्हाला शेतकऱ्यांसाठी संबंधित सर्व योजनांना थेट अर्ज करता येतो. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. याशिवाय हॅलो कृषी मध्ये जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, पशु खरेदी विक्री, सर्व पिकांचा बाजारभाव यांसारख्या अनेक सुविधांचा मोफत लाभ घेण्यात येईल. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि सर्व सुविधांचा लाभ घ्या.

सरकारवर 20 हजार कोटींचा भार पडणार – PM Kisan Yojana

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेची रक्कम वाढवल्यास सरकारवर 20 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होईल. जो मार्च चालू आर्थिक वर्षातील 2024 पर्यंत या योजनेच्या बजेटमध्ये 60 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढेल. दरम्यान, आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १४ हप्ते मिळाले असून लवकरच 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!