PM Kisan Yojana : 9 कोटी शेतकऱ्यांना मिळणार, 21 हजार कोटी रुपये; पीएम मोदी बुधवारी यवतमाळमध्ये?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 16 वा हप्ता बुधवारी (ता.२८) जारी केला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील यवतमाळ या ठिकाणाहून हा सोळावा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांसाठी जारी करणार आहेत. या 16 व्या हप्त्याअंतर्गत देशातील जवळपास 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये वितरित केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हा 16 वा हप्ता सभा घेत यवतमाळ येथून, जारी करणार आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या या यवतमाळ दौऱ्याची संपूर्ण तयार झाली असल्याचे (PM Kisan Yojana) प्रशासनाने म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ (PM Kisan Yojana In India)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 15 वा हप्ता झारखंड राज्यातील खुंटी येथून जारी केला होता. सरकारच्या उपलब्ध माहितीनुसार 15 व्या हप्त्याअंतर्गत आतापर्यंत 8.11 शेतकऱ्यांना 18.61 हजार कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. त्या तुलनेत १६ व्या हप्त्याच्या वाटपात जवळपास 90 लाख शेतकऱ्यांची वाढ होणार आहे. असेही सरकारकडून संगितले जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यत 15 हप्त्यामध्ये एकूण 2.81 लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्याचेही सरकारकडून सांगितले जात आहे.

26 एकरवर सभा मंडप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जवळील भारी येथील मैदानावर बचत गटाच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 46 एकर खुल्या जागेवर हा मेळावा होणार असून, 26 एकरवर सभा मंडप उभारण्यात आला आहे. जवळपास दोन लाख महिला या मेळाव्यासाठी हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी मोदी यांच्या दौऱ्यासाठी संपूर्ण तयारीची पाहणी केली आहे. मात्र असे असतानाच राज्यात सध्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना, सरकारवर शेतकऱ्यांचा रोष आहे. त्यामुळे ऐनवेळी पंतप्रधान मोदींचा हा दौरा आभासी (दूरदृश्यप्रणालीद्वारे) प्रणाली द्वारे देखील घेतला जाऊ शकतो. असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!