PM Kisan Yojana : मोठी बातमी…! राज्यातील शेतकऱ्यांना उद्या एकाचवेळी 6000 रुपये मिळणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (PM Kisan Yojana) असून, सर्व शेतकऱ्यांना उद्या अर्थात 28 फेब्रुवारी 2024 रोजी एकूण 6000 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांना उद्या दिला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील यवतमाळ येथील एका समारंभात हा पीएम किसानचा 16 वा हप्ता वितरीत करणार आहे. तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून एकूण 4000 रुपये इतकी रक्कम राज्य सरकारकडून वितरित केली जाणार आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना (PM Kisan Yojana) एकूण 6000 हजार रुपये सरकारकडून एकाच वेळी दिले जाणार आहे.

पीएम किसान उत्सव दिवस (PM Kisan Yojana In Maharashtra)

केंद्र सरकारने 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यवतमाळ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.

27638 कोटी रुपये वितरित

देशभरातील शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी 6000 रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत 24 फेब्रुवारी, 2024 अखेर राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 27,638 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे.

यवतमाळ येथील पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी वितरण समारंभात शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे. त्यासाठी https://pmindiawebcast.nic.in ही लिंक राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!