हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) ही केंद्रातील मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेच्या अंतर्गत दरवर्षी देशभरातील करोडो अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. 2000 रुपयांच्या प्रत्येकी 3 हप्त्याच्या माध्यमातून हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 13 हप्ते शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले असून आता 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्याला आहे. त्यातच आता सरकारने या योजनेमध्ये 4 नवीन बदल केले आहेत. ते जाणून घेणं आवश्यक असून नाहीतर तुम्हाला 14 वा हप्त्याला मुकावे लागेल.
1) बेनीफिशियरीचे स्टेटस–
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेमध्ये बेनिफिशियरी स्टेटस मध्ये बदलाव करण्यात आलेला आहे. आता योजना धारक या बेनीफिशियरी स्टेटस वरूनच या योजनेची माहिती घेऊ शकतील त्याचबरोबर खात्यात हप्ते जमा होत आहेत की नाही याची माहिती सुद्धा यावरूनच मिळेल. यासाठी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला पोर्टल वर जाऊन आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅप्चा कोड दिला जाईल. हा कोड भरल्यानंतर डाटा वर जाऊन क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हे बेनीफिशियरीचे स्टेटस दिसेल.
2) या अँप वरून PM किसान योजनेचा लाभ मिळवा
शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असे सर्च करा. हॅलो कृषी अँपवर सरकारी योजना, जमीन मोजणी, हवामान अंदाज, बाजारभाव, जमीन खरेदी विक्री आदी सेवा मोफत दिल्या जातात. PM Kisan योजनेसाठी सरकारी योजना विभागात जाऊन हवी असलेली योजना निवडा. इथे तुमच्या हप्ता बद्दल, या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. त्यासाठी तुम्हाला केवायसी करायची गरज नसून या ॲप साठी फेस केवायसी ला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही ॲप ओपन केल्यावर तुमचा चेहरा दिसल्यावर तो स्कॅन होईल. त्यानंतर तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून सर्व माहिती मिळेल.
3) मंजुरी प्रक्रिया –
जर या योजनेमध्ये तुमचं नाव चुकलेलं असेल तर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपच्या कोड टाकून, दुसऱ्या पेजवर दिलेली संपूर्ण माहिती मध्ये जाऊन आधार कार्ड वर टाकलेल्या नावाप्रमाणे नाव टाकून चुकलेलं नाव बदलू शकता. यापूर्वी हे काम करणं कठीण होत, परंतु सरकारने हे सोप्प करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.