PM Kisan Yojana : पीएम किसानसाठी राज्यभरात विशेष मोहीम; सहभागासाठी कृषी विभागाचे आवाहन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबविली जात आहे. या योजनेच्या 16 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी आणि ‘ई-केवायसी’ सह अन्य बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. या योजनेची नोंदणी आणि ‘ई-केवायसी’ करण्यासाठी राज्यात 15 जानेवारीपर्यंत गावागावांमध्ये राज्य सरकारकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारच्या या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन (PM Kisan Yojana) राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

देशातील शेतकऱ्यांना एक निश्चित उत्पन्न मिळावे, यासाठी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. तर आता या योजनेचा 16 वा हप्ता लवकरच वितरीत करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या विशेष मोहिमेत सहभागी होत शेतकऱ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

‘या’ बाबींची पूर्तता आवश्यक (PM Kisan Yojana Special Campaign)

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केलेल्या लागवडीधारक क्षेत्र असलेले तसेच ज्या शेतकऱ्यांची बँक खाती आधारकार्ड सोबत जोडलेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेची ई-केवायसी केली असेच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. या योजनेसाठी पती, पत्नी व त्यांच्या १८ वर्षाखालील अपत्यांचा समावेश असेल, अशा सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2 हजार रुपये प्रत्येक हप्त्यासाठी दिले जात आहे.

यांच्याशी साधा संपर्क

ज्या शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंदी केलेल्या नसतील. अशा शेतकऱ्यांनाही योजनेत (PM Kisan Yojana) सहभागी होण्याची संधी असून, त्यांनीही आपल्या गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयास भेट द्यावी. ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करायची असेल, अशा शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असेही आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

अशी करा घरबसल्यास ई-केवायसी

  • Online e-KYC करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या स्मार्ट फोनमध्ये Google Play Store मध्ये जावे लागेल. त्यात PM Kisan Go टाईप केल्यास – तुम्हाला पीएम किसानचे अॅप मिळेल.
  • हे अॅप तुम्हाला Download आणि Install करावे लागेल.
  • हे अॅप उघडल्यानंतर तुम्हाला PM Kisan e-KYC by Face Authentication नावाचा डॅशबोर्ड दिसेल.
  • या ठिकाणी तुम्हाला Login ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल. ज्यावर PM Kisan e-KYC by Face Authentication लिहिलेले असेल.
  • या ठिकाणी विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. आणि त्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल.
  • यानंतर PM Kisan e-KYC by Face Authentication हा डॅशबोर्ड ओपन होईल.
  • या ठिकणी तुम्हाला e-KYC For Other Beneficiaries यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर PM Kisan e-KYC by Face Authentication चे नवीन पेज ओपन होईल.
  • याठिकाणी तुम्हाला तुमची माहिती भरून Proceed ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर पुन्हा PM Kisan e-KYC by Face Authentication चे पेज ओपन होईल.
  • या ठिकाणी तुम्हाला Scan Face ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आपला चेहरा स्कॅन करावा लागेल. चेहरा स्कॅन होताच तुमची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल. आणि तुम्हाला याबाबत मेसेज येईल.
error: Content is protected !!