PM Kisan : शेतकऱ्यांनो ‘हे’ काम लवकर पूर्ण करा, अन्यथा 14 वा हप्ता जमा होणार नाही; जाणून घ्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) ही एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजेनमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक सहाय्य मिळते. त्यामुळे शेतकरी या योजनेच्या हप्त्यांची वाट पाहत असतात. केंद्र सरकारने आतापर्यंत पीएम किसानचे 13 हप्ते जारी केले आहेत. आता शेतकरी 14 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र केंद्र सरकारकडून अद्याप तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

याबाबत असे म्हटले जात आहे की मोदी पुढील महिन्यापर्यंत 14 वा हप्ता जारी करू शकतात. त्यामुळे शेतकरी या हप्त्याची वाट पाहत आहेत. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही आणि त्यांचा खाते क्रमांक आधारशी लिंक केलेला नाही, ते 14व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 व हप्ता जमा होणार नसल्याचे बोलले जात आहे. (PM Kisan)

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान योजनेसारख्या अनेक सरकारी योजनांची माहिती घरबसल्या मिळवायची असेल तर आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहोत. तुम्ही लगेच प्ले स्टोअरवर जा आणि Hello Krushi हे आपले अँप मोबाईलमध्ये इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला सर्व सरकारी योजनांची माहिती मिळेल त्याचबरोबर बाजारभाव, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, हवामान अंदाज इत्यादींची देखील माहिती मिळेल. त्यामुळे आजच hello krushi हे अँप डाउनलोड करा.

त्याचबरोर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हप्त्याची रक्कम फक्त NPCI शी लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाईल. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, लवकरच तुमचे खाते आधार आणि NPCI लिंक करा. या सर्व गोष्टी पूर्ण केल्या तरच तुमच्या खात्यावर 14वा हप्ता जमा होईल.

error: Content is protected !!