Pm Kisan Yojna : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! खात्यात अजूनही जमा झाला नसेल 14 वा हप्ता, तर ‘या’ हेल्पलाईन नंबरवर करा कॉल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pm Kisan Yojna : मागच्या काही दिवसापासून शेतकरी पंतप्रधान किसान निधी योजनेच्या १४ व्या हप्ताव्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 27 जुलै रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. देशातील आठ कोटींपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांनी या हप्त्याचा लाभ घेतला आहे. DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहे.

आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून या माध्यमातून जवळपास 2.19 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र आता यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. जर तुमच्याही खात्यावर रक्कम जमा झाली नसेल तर नेमकं काय करावे? तर तुम्ही हेल्पलाइन नंबर वर कॉल करू शकता. (Pm Kisan Yojna )

शेतकऱ्यांनो तुम्ही हेल्पलाईन नंबरवर संपर्क तर साधू शकता त्याचबरोबर एक अजून सोपी पद्धत म्हणजे. प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi हे शेतीचे अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला सरकारी योजनांसंबंधी कोणतीही अडचण असल्यास काय करावे यासंबंधी माहिती मिळेल. तीही अगदी मोफत. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्लेस्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप इंस्टाल करा.

या क्रमांकावर करा कॉल

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266

पीएक किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266

पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606

14व्या हप्त्याबाबत कोणतीही अडचण असल्यास : 011-24300606

ई-मेलवरही करू शकताय तक्रार दाखल

शेतकरी मित्रानो वरील दिलेल्या नंबरवरून तुम्ही तक्रार दाखल करू शकताय. मात्र त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची तक्रार ईमेलवर देखील करू शकता. [email protected] या ईमेल आयडीवर वर संपर्क साधा.

error: Content is protected !!