हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार द्वारे ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ (PM Kusum Yojana) राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येत असून यात सर्वसाधारण घटकासाठी केंद्र ३० टक्के, राज्य १० टक्के, लाभार्थी १० टक्के तर वित्त संस्थांकडून ५० टक्के हिस्सा आहे, तर अनुसूचित जाती आणि जमातींसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के आहे, केंद्र ३० टक्के तर राज्य ६५ टक्के हिस्सा देते.
शेतकर्यांसाठी अतिशय फायदेशीर असणारी ही योजना सध्या शेतकर्यांना एका वेगळ्याच कारणामुळे डोकेदुखी बनलेली आहे. आणि ते कारण म्हणजे या योजनेची (PM Kusum Yojana) ‘बनावट वेबसाईट’.
होय तुम्ही बरोबर वाचलात! पंतप्रधान कुसुम योजनेच्या (PM Kusum Yojana) नावाखाली शेतकर्यांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे देशभरात समोर आलेली आहेत. अशा बनावट वेबसाईट्स द्वारे सर्वसामान्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे व माहिती गोळा केली जात आहे.
हॅलो कृषी कडे महाराष्ट्रातील शेतकरी श्री. पांडुरंग गावडे यांनी त्यांच्या सोबत झालेल्या फसवणुकीची माहिती शेयर केली आहे.
प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या (PM Kusum Yojana) बनावट वेबसाईटने त्यांना २ लाख या एकूण रकमेवर ९० टक्के अनुदान मिळालेले आहे आणि उर्वरित १० टक्के रक्कम म्हणजेच २०,००० रुपये तुम्हाला भरायचे आहेत, असे सांगून त्यांच्याकडून रीतसर आवेदनपत्र भरून घेतले व रक्कम सुद्धा गोळा केली. परंतु त्यानंतर योजनेसंबंधी (PM Kusum Yojana) पुढच्या कोणत्याही घडामोडी किंवा माहिती त्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. संपूर्ण देशातून नवनवीन फसवणुकीच्या घटना समोर आल्यावर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे.
केंद्राच्या नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने (MNRE) सर्वसामान्यांना सावध करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयातर्फे प्रधानमंत्री कुसुम योजने (PM Kusum Yojana) अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी तिच्या कोणत्याही वेबसाइटद्वारे केली जात नाही. या योजनेसाठी नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयची (MNRE) नोंदणी वेबसाइट असल्याचा दावा करणारी कोणतीही वेबसाइट दिशाभूल करणारी आणि फसवी आहे, असे त्यांनी घोषित केले आहे. केंद्र सरकारने शेतकर्यांना अशा संकेतस्थळांची माहिती मिळाल्यास विभागाला कळवण्याचा इशारा दिला आहे.
कोणत्या वेबसाईटद्वारे अर्ज करू नये? (Fraud Website)
अलीकडे असे दिसून आले आहे की काही नवीन वेबसाइट्स (www.pmkusumyojana.co.in आणि www.punjabsolarpumps.com) यांनी बेकायदेशीरपणे प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी (PM Kusum Yojana) नोंदणी पोर्टल असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी या संकेतस्थळांवर पैसे जमा करणे टाळावे. तसेच डिजिटल किंवा प्रिंट प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्यापूर्वी सरकारी योजनांसाठी नोंदणी पोर्टल असल्याचा दावा करणाऱ्या वेबसाइट्सची सत्यता तपासण्याचा सल्ला दिला जातो.
फसवणूक झाल्यास काय करावे? (What to do in case of fraud?)
कोणतीही संशयित फसवणूक करणारी वेबसाइटवर जर कोणी भेट दिली, तर लगेच नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयला (MNRE) कळवावे. या संबंधित माहिती www.mnre.gov.in वर उपलब्ध आहे. तुम्ही या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा,
टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर 1800-180-3333 कॉल करा.
अधिकृतरीत्या अर्ज करण्यासाठी काय करावे? (where To Apply Officially)
गुगल वरून अर्ज करताना तुमची फसवणूक होऊ शकते. कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे Hello Krushi हे मोबाईल अॅप. यासाठी तुम्ही थेट गुगल प्ले स्टोअरवरील ‘Hello Krushi’ नावाचे मोबाईल अॅप डाउनलोड करून त्याद्वारे योजनेचा अर्ज करू शकता.
यासाठी खालील स्टेप्स फॉलो अप करा
१) सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असे सर्च करावे आणि हॅलो कृषी नावाचे मोबाईल अॅप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्यावे.
२) यानंतर नाव, गाव, मोबाईल नंबर आदि माहिती भरून हॅलो कृषी अॅपला मोफत रजिस्ट्रेशन करावे.
३) आत Hello Krushi अॅप ओपन करून होम पेजवर सरकारी योजना हा विभाग निवडावा.
४) इथे तुम्हाला राज्य तसेच केंद्र सरकारच्या सर्व योजनांची यादी दिसेल.
५) यामधील तुम्हाला अर्ज करायचा असलेली योजना निवडून Apply बटनावर क्लिक करून पुढील प्रक्रिया करावी.