PM Kusum Yojana : महत्वाची बातमी! वीज न वापरता करता येणार शेती, सोलर पॅनलसाठी शासनाचे देतंय ‘इतक’ अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेअंतर्गत, (PM Kusum Yojana) शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90% पर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार (State Govt) 30-30% सबसिडी देतात आणि उर्वरित 30% कर्ज बँका देऊ शकतात. देशातील बहुतांश भागात वीजटंचाईची समस्या भेडसावत आहे. ज्याचा थेट परिणाम शेती आणि सिंचनावर होतो. त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. प्रत्येक शेतकरी सिंचनासाठी महागडे साधन वापरू शकत नाही.

Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वच शेतकऱ्यांना या अवजारांचा वापर करणे सोपे नाही. अशा स्थितीत केंद्र व राज्य सरकारकडून सिंचनासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. पीएम कुसुम योजना ही देखील अशीच एक योजना आहे जिथे शेतकऱ्यांना अनुदानाद्वारे सौर पंप बसवण्याची सुविधा दिली जाते. जेणेकरुन शेतकऱ्यांना शेतीत पाण्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

काय आहे PM Kusum Yojana?

ही योजना ऊर्जा मंत्रालयाने 2019 मध्ये सुरू केली होती. या योजनेंतर्गत 30% अनुदान केंद्र सरकार, 30% राज्य सरकार आणि 30% इतर वित्तीय संस्थांद्वारे दिले जाते. यामध्ये शेतकऱ्यांना फक्त 10 टक्के रक्कम द्यावी लागेल. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना वीज आणि डिझेल खर्च करावे लागत नाही आणि त्यांचे विजेवरील अवलंबित्वही कमी होते. त्यामुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो.

वीज विकून कमाई?

सोलर पंपाचा उपयोग केवळ शेती आणि सिंचनासाठीच नाही तर वीजनिर्मितीसाठीही करता येतो. या योजनेद्वारे वीज किंवा डिझेलवर चालणाऱ्या सिंचन पंपांचे सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांमध्ये रूपांतर करता येईल. त्यानंतर जी वीज शिल्लक राहते ती वितरण कंपन्यांना विकता येईल. जर तुमच्याकडे 4-5 एकर जमीन असेल तर वर्षाला मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करून चांगला नफा सहज मिळवता येतो. PM Kusum Yojana

घरबसल्या Hello krushi ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज

शेतकरी मित्रांनो सरकार राबवत असलेल्या योजना या आपल्यासाठी अधिकच महत्वाच्या आहेत. या योजनांमुळे शेती व्यवसायात शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी मदत होते. यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi ॲप सर्च करा आणि इंस्टॉल करा. त्यानंतर या ॲपद्वारे आपल्याला हव्या असलेल्या योजनांची माहिती मिळू शकते. तसेच हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही योजनांना अर्ज करून लाभ मिळवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागत नाही. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi डाउनलोड करा.

याप्रमाणे अर्ज करा?

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी राज्यांच्या विविध अधिकृत वेबसाइट जारी केल्या आहेत. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तुम्ही https://mnre.gov.in/ वरून यासंबंधी सर्व माहिती मिळवू शकता.

आवश्यक कागदपत्रे

यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे आधारकार्ड, रेशनकार्ड, आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक, बँक पासबुकची फोटो प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि शेतीशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करणे आव

error: Content is protected !!