PMGKAY Scheme : पुढील पाच वर्ष मोफत रेशन मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणाली योजनेंतर्गत (PMGKAY Scheme) पात्र नागरिकांना पुढील 5 वर्षांसाठी मोफत धान्य उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.29) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय (PMGKAY Scheme) घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या योजनेचा देशातील 81 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY Scheme) एप्रिल 2020 मध्ये कोरोना काळात सुरु करण्यात आली होती. या योजनेद्वारे लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ आणि गहू दिले जात आहेत. याशिवाय हरभरा डाळ देखील या योजनेअंतर्गत दिली जात आहे. बिकट आर्थिक परिस्थितीत गरीब आणि गरजूंना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक आणि तेलंगणासह पाच राज्यातील सध्या सुरु असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

81 कोटी नागरिकांना फायदा

केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना कोरोना काळात सुरु करण्यात आली होती. सरकारने या योजनेला आता 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे प्रत्येक कुटुंबातील प्रति व्यक्ती 5 किलोप्रमाणे मोफत धान्य दिले जाणार आहे. या योजनेचा देशातील 81 कोटी नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना 35 किलो धान्य मिळत राहील. असेही ठाकूर यांनी म्हटले आहे. तर सरकारकडून या योजनेसाठी पुढील काळात 11.80 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले आहे.

error: Content is protected !!