POCRA Navin Vihir Yojana: नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत नवीन विहीर योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मराठवाडा व विदर्भातील (POCRA Navin Vihir Yojana) शेतकर्‍यांना गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागत असून, भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. पूर्णा नदीच्या खोऱ्यातील भूभाग हा निसर्ग हाच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच राज्यात कृषी संजीवनी (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana) प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. या अंतर्गत नवीन विहीर (POCRA Navin Vihir Yojana) खोदण्यासाठी देण्यात येते.

नवीन विहीर योजनेचे उद्दिष्ट (POCRA Navin Vihir Yojana Objective)

  • या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे
  • संरक्षित सिंचनाची सोय निर्माण करणे व पीक उत्पादनात वाढ करणे

अनुदानासाठी लाभार्थी निवडीच्या अटी आणि पात्रता (POCRA Navin Vihir Yojana)

  • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठी ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले अत्यल्प व अल्पभूधारक शेतकर्‍यांना तसेच अनुसूचित जमाती/ जाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्य  
  • विहीर घेण्यासाठी एकूण जमिनीचे क्षेत्र हे 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • ज्या शेतकर्‍याकडे संरक्षित शेती सिंचनाची सोय नाही, अशा शेतकर्‍यांना लाभ देण्यात यावा. आधी या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार नाही.
  • लाभार्थी निवड करताना प्रास्ताविक नवीन विहीर व पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक स्रोत यातील अंतर 500 मीटरपेक्षा जास्त असल्याची खात्री करावी.
  • महाराष्ट्र भूजल अधिनियम अधिनियम 2009 अनुसार पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोता व्यतिरिक्त प्रास्ताविक विहीर व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरीचे अंतर 150 मीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • गावातील अस्तित्वातील व प्रास्ताविक असे एकूण सिंचन विहिरींची संख्या लागवडी योग्य क्षेत्राच्या 8 विहिरी प्रति चौरस किलोमीटर पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरींसाठी स्थळ निश्चितीसाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्याकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
  • अति शोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरी घेण्यास मनाई असणार आहे.
  • नवीन विहीर खोदणे व अन्य बाबींची पूर्तता या कामांसाठी कमाल 1 वर्षाचा कालावधी अनुज्ञेय आहे.

अनुदान किती? (POCRA Navin Vihir Yojana)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबवण्यात येणार्‍या नवीन पाणी साठवण निर्मिती म्हणजे नवीन विहिरीची निर्मिती या घटकांतर्गत 100 टक्के अनुदान दोन टप्प्यात देण्यात येईल.

पहिला टप्पा – विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार एकूण खोद कामावरील खर्च

दुसरा टप्पा – विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार देय रक्कम

100 टक्के अनुदान रुपये 2.50 लाख अनुदान थेट लाभार्थीच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे

7/12 उतारा

8-अ प्रमाणपत्र

या योजनेस पात्र आणि इच्छुक शेतकर्‍यांनी https://dbt.mahapocra.gov.in या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

error: Content is protected !!