PoCRA Yojana: पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम होणार पूर्ण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात राबवण्यात आलेल्या (PoCRA Yojana) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पोकरा – PoCRA प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवरील कामांना अंतिम स्वरूप देण्यात येत असून, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम 30 जून रोजी संपत आहे. प्रकल्पातील (PoCRA Yojana) कंत्राटी मनुष्यबळाच्या सेवाही संपुष्टात येणार आहेत.

पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम होणार पूर्ण! (PoCRA Yojana)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana) जागतिक बँकेच्या आर्थिक सहाय्याने विदर्भ-मराठवाड्यातील 16 जिल्ह्यांमध्ये कृषी व्यवसाय (Agriculture Business) फायदेशीर करण्यासाठी हवामान बदलामुळे (Climate Change) निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला.

हे सुद्धा वाचा: नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत नवीन विहीर योजना

पोकरा-2 ची अंमलबजावणी (PoCRA Yojana)

सुरुवातीला सहा वर्षांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा – PoCRA Yojana) प्रकल्प जाहीर करण्यात आला होता. आता पोकरा 2.0 नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्प दुसर्‍या टप्प्यात राबवण्यात येणार आहे.

प्रकल्प संचालक परिमल सिंग यांनी गेल्या आठवड्यात जारी केलेल्या पत्रानुसार, ग्राम कृषी संजीवनी समिती, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावर कार्यालयीन अभिलेख अद्ययावत व हस्तांतरण, जड संकलन रजिस्टर अद्ययावत व हस्तांतरण, प्रकल्पातील सर्व संगणकावरील माहितीचा बॅकअप घेणे, प्रकल्पांतर्गत सर्व प्रलंबित पत्रांवर प्रक्रिया करणे, ग्राम कृषी संजीवनी समितीचे बँक खाते बंद करणे, लेखापरीक्षण करणे, लेखापरीक्षणात उपस्थित झालेल्या मुद्यांचा ठराव अहवाल संबंधित लेखापरीक्षकांना सादर करणे आदी सूचना, इ.

या प्रकल्पात कंत्राटी स्वरुपात नेमलेले मनुष्यबळ (Contractual Manpower) 30 जून 2024 पर्यंत कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर त्या सर्वांच्या सेवा समाप्त होत आहेत. याबाबत कार्यवाही करून त्याचा प्राथमिक अहवालही परिमल सिंह यांनी 15 मेपर्यंत सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

विविध पोकरा अनुदान योजना (PoCRA Yojana)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पंप संच व पाईप अनुदान, परसातील कुक्कुटपालन, नवीन विहीर, विहीर पुनर्भरण, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन अनुदान, हरितगृह/शेडनेटगृह उभारणी, मधुमक्षिका पालन, गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यूनिट, शेततळे, रुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) अनुदान, अशा विविध पोकरा अनुदान योजना (Subsidy Scheme) राबविण्यात येतात.

नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • संबंधित शेतक-यांचे आधारकार्ड,
  • सातबारा उतारा, व आठ-अ,
  • मोबाईल क्र.
  • अर्जदार अनुसुचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र,
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे.

पोकरा योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज (Online Application for POCRA Yojana)

प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड या घटकांचा लाभ घेण्याकरिता प्रकल्प गावातील इच्छुक असलेले शेतकरी बांधवांनी प्रकल्पाने उपलब्ध करुन दिलेल्या पुढील संकेतस्थळावर http://dbt.mahapocra.gov.in  नोंदणी करावी. एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ट फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड बाबींकरिता स्वतंत्र अर्ज करावा.

हे सुद्धा वाचा https://hellokrushi.com/pocra-yojana-organic-input-production-unit-subsidy-scheme/    

पोकरा अनुदान (PoCRA Yojana) लाभार्थी यादी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांची गावातील पोकरा अनुदान लाभार्थी यादी आता एका क्लिकवर पाहता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती सर्वांसाठी पारदर्शकपणे खुली झाली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

अधिक माहितीसाठी प्रकल्प गावातील संबंधित कृषि सहाय्यक किंवा समूह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र कृषि विभागाने केले आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, 30 A/B आर्केड, वर्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-400005

संकेतस्थळ : https://mahapocra.gov.in

ईमेल : [email protected] / [email protected]

फोन : 022 – 22163351

error: Content is protected !!