POCRA Yojana: पोकरा अंतर्गत गांडुळ खत/नाडेप/सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: नैसर्गिक हवामान बदलामुळे (POCRA Yojana) उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळून घेण्यास शेतकऱ्यांना मदत करून सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासना मार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Prakalp) सुरू करण्यात आला. गांडुळ खत हे शेतातील काडीकचरा, शेण, वनस्पतीजन्य पदार्थ यापासून गांडुळा मार्फत बनविले जाते. या खतामध्ये विविध अन्नद्रव्ये, संजीवके तसेच शेतीसाठी उपयुक्त जीवाणू असल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते (POCRA Yojana).

गांडुळ खत/नाडेप/सेंद्रिय निविष्ठा यांचे महत्व लक्षात घेऊन उत्पादन यूनिट (Production Unit) यासाठी अनुदान योजना (Subsidy Scheme) सुरु करण्यात आलेली आहे. (The Vermicompost/Nadep/Organic Input Production Unit Subsidy Scheme)

गांडुळ खत उत्पादन यूनिट अनुदान उद्दिष्टे (POCRA Yojana)

  • शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ करणे.
  • सेंद्रिय शेतीच्या (Organic Farming) माध्यमातून पौष्टिक अन्न धान्याचे उत्पादन घेणे.
  • शेत जमिनीची सुपीकता (Soil Fertility) दीर्घ काळापर्यंत वाढवणे.
  • नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती करणे.
  • नैसर्गिक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळून घेण्यास शेतकऱ्यांना मदत करून सक्षम बनविणे.

गांडुळ खत उत्पादन यूनिट अनुदान योजनेत कोण सहभागी होऊ शकतात (POCRA Yojana)

  1. अर्जदार 2 – 5 हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी 65% अर्थसहाय्य देय आहे.
  2. प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी 75% अर्थसहाय्य देय आहे.

नाडेप कंपोस्ट उत्पादन यूनिट लाभार्थी पात्रता (NADEP Compost Production Unit)

  • ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी त्यामध्ये अल्प/अत्यल्प भूधारक,अनुसूचित जाती जमाती महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्य क्रमानुसार लाभ देण्यात येईल.
  • ज्या शेतकर्‍यांकडे गांडुळ खत यूनिट उभारण्याकरिता जागा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो.
  • इतर कोणत्याही योजनेतून सदर घटकांतर्गत शेतकर्‍याने लाभ घेतलेला नसावा.
  • गांडुळ खत यूनिट उभारल्यानंतर ते व्यवस्थित सुरु राहण्यासाठी किमान दोन पशुधन उपलब्ध असावेत.

सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान आवश्यक कागदपत्रे

7/12 उतारा

8- अ प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमाती असल्यास)

किती अनुदान मिळेल?

सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यूनिट साठी रु.6000/- असा खर्चाचा मापदंड आहे. तर गांडूळ खत उत्पादन यूनिट/नाडेप कंपोस्ट यूनिटसाठी रु.10,000/- असा खर्चाचा मापदंड आहे

अनुदान अर्ज कुठे करावा (POCRA Yojana)

इच्छुक पात्र शेतकर्‍यांनी https://dbt.mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

पूर्वसंमती मिळाल्यानंतर काय करायचे

लाभार्थी  शेतकऱ्याने पुर्वसंमती मिळाल्यानंतर तांत्रिक निकषाप्रमाणे प्रकल्पाची उभारणी करावी. त्यासाठी लागणारे साहित्य सामुग्री विकत घेऊन प्रकल्पाचे काम पूर्ण करून घ्यावे . तसेच प्रकल्प यूनिट बांधकाम लाभार्थी यांनी त्यांच्या आवडीच्या  बांधकाम व्यावसायिकाकडून अथवा मजुरीने करून घ्यावे. आणि अनुदान मिळवण्यासाठी गांडूळ यूनिटची उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन अनुदान मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांचे कडे करावी. तसेच  सोबत आवश्यक देयके शेतकरी यांनी स्वत:ची स्वाक्षरी करून ऑनलाईन अपलोड करावीत. त्यानंतर काही कालावधीतच अनुदान थेट लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.

error: Content is protected !!