Pomegranate Farming : डाळिंब फुगवणीसाठी करा ‘हे’ उपाय, मिळेल अधिक उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात डाळिंब लागवडीखालील क्षेत्र (Pomegranate Farming) हे मोठ्या प्रमाणात असून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात होते. राज्यातील शेतकरी डाळिंब पिकातून उत्पादनही अधिक मिळवतात. तसेच डाळिंबाला बाजारात मागणी देखील अधिक असते. मात्र, डाळिंबाला असलेली मागणी ही त्याच्या आकार आणि गुणवत्तेवरून असते. डाळिंबाचा आकार मोठा असेल तर त्याला दरही अधिक मिळतो. अशातच आता तुम्हीही मोठ्या आकाराच्या डाळिंबाचे उत्पादन घेण्याचा विचार करत असाल तर डाळिंब फुगवणीसाठी (Pomegranate Farming) काय केले पाहिजे? हे आज आपण समजून घेणार आहोत.

फुगवणीसाठी काय करावे? (Pomegranate Farming In Maharashtra)

डाळिंब पिकाचे (Pomegranate Farming) वेळेत व्यवस्थित व्यवस्थापन न केल्यास, त्याचा फळ गुणवत्तेवर आणि फुगवणीवर परिणाम होतो. त्यामुळे डाळींबाच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेत फळाच्या वाढीसाठी आणि रंगाच्या गुणवत्तेसाठी काही उपाय करणे गरजेचे असते. त्यासाठी डाळिंब पिकावर एखाद्या किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसताच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत उपाययोजना करावी. याशिवाय गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादन मिळवण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट 5 किलोग्रॅम आणि बोरोन 1 किलोग्रॅम प्रति एकराच्या हिशोबाने ठिबकच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेळी द्यावे. तर ऑर्थो सिलिकॉन 3%, 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी. याशिवाय एनपीके 0:52:34 हे 5 किलो प्रति एकराला आठवड्यातून एकदा ठिबकच्या माध्यमातून पिकाला पाणी देताना द्यावे. ज्यामुळे डाळिंबाच्या फुगवणीला मोठी मदत होते.

योग्य जातीची निवड

शेतकऱ्यांना अधिक उत्पादनासह गुणवत्तापूर्ण डाळींब उत्पादित (Pomegranate Farming) करायचे असल्यास, त्यांना योग्य जातीची निवड करणे खूप गरजेचे असते. याशिवाय डाळिंब हे उष्णकटिबंधीय वातावरणातील फळ असून, अधिक काळापर्यंत उच्च तापमान राहिल्यास डाळिंबाच्या गोडीत आणि चवीत आणखी वाढ होते. याउलट दमट हवामानामुळे फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन, डाळिंबावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

1. गणेश वाण

  • सध्या राज्यातील लागवडीखाली असलेले बहुतांश क्षेत्र हे ‘गणेश’ या वाणाखाली असून, हे वाण गणेशखिंड, फळ संशोधन केंद्र, पुणे या ठिकाणी डॉ. जी.एस.चीमा यांच्‍या प्रयत्‍नाने शोधून काढण्‍यात आले आहे. या वाणाचे वैशिष्‍टये असे की, बिया मऊ असून दाण्‍याचा रंग फिक्‍कट गुलाबी असतो. फळात साखरेचे प्रमाणही चांगले आहे. व या वाणापासून उत्‍पादन चांगले मिळते.

2. मृदुला वाण

  • डाळिंबाचे हे वाण ‘गणेश’ व ‘गुल ए शाह रेड’ या वाणांच्या संकरित पध्दतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. या वाणाची फळे
    आकाराने मध्यम 300 ते 350 ग्रॅम वजनाची असून, फळांचा रंग व दाण्यांचा रंग गडद लाल असतो. बी अतिशय मऊ आणि दाण्यांचा आकार मऊ असतो. चवीला या वाणाचे डाळिंब जवळपास गणेश वाणासारखेच असते.

3. भगवा वाण

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ‘फुले भगवा सुपर’ हे वाण राज्यात बऱ्याच ठिकाणी लागवडीत आहे. हे वाण गर्द केशरी रंगाचे असते. फळांची साल जाड व चकचकीत असून, दाणे मऊ आहेत. फळांमध्ये रसाचे प्रमाण भरपूर असते. फळांचे सरासरी उत्पादन 24 किग्रॅ. प्रति झाड आहे. देशांतर्गत तसेच निर्यातीसाठी ही जात उत्तम आहे.
error: Content is protected !!