Potato Production : राज्यातील बटाटा उत्पादनात 35 ते 40 टक्के घट; अल्प पावसाचा परिणाम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने, बटाटा उत्पादनावर (Potato Production) त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय. साधारणपणे राज्यात रब्बी हंगामात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात बऱ्यापैकी बटाटा शेती केली जाते. मात्र यावर्षी राज्यातील बटाटा उत्पादन जवळपास 35 ते 40 टक्क्यांनी घटले असल्याचे सांगितले जात आहे. यंदा प्रामुख्याने खरिपातच पाणी पुरले नाही. तेव्हा रब्बीत बटाटा पीक कसे घेणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता. त्यामुळे यंदा राज्यातील बटाटा उत्पादनात (Potato Production) घट दिसून आली आहे.

‘या’ जिल्ह्यांत होते लागवड (Potato Production 35 to 40 Percent Decline)

राज्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, नाशिक आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये बटाटा पीक (Potato Production) घेतले जाते. साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या लागवडीनंतर बटाटा पीक फेब्रुवारी-मार्च महिन्यात काढली येते. मात्र, गेल्या वर्षी मॉन्सून काळात पावसाने खेळलेला लपंडाव आणि त्यानंतरही अपेक्षाकृत पाऊस न झाल्याने धरणे रिकामीच राहिली. परिणामी, यंदा अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना रब्बीची पिके घेता आली नाही. ज्याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असून, राज्यातील बटाटा उत्पादन घटले आहे.

दराचा शेतकऱ्यांना फायदा नाहीच

सामान्यपणे फेब्रुवारी मार्च या महिन्यांमध्ये बटाटा आवक (Potato Production) वाढून दरात घसरण होते. मात्र, यंदा याउलट परिस्थिती असून योग्य त्या प्रमाणात आवक होत नसल्याने, सध्या बाजारात बटाट्याला कमाल 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. अहमगनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, सध्या राज्यात बटाटा दर चांगले असले तरी यंदा पावसाळा कमी झाला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना बटाटा पीक घेता आलेले नाही. तर उपलब्ध पाण्यावर ज्या शेतकऱ्यांनी बटाटा पीक घेतले. त्यांचे देखील एकरी उत्पादन घटले आहे. ज्यामुळे बटाट्याला बाजारात चांगला दर असला तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नसल्याचे या शेतकऱ्याने म्हटले आहे.

दरम्यान, बटाटा हे थंड हवामानातील पीक असल्याने महाराष्ट्रात रब्बी हंगामात बटाटा उत्पादन अधिक येते. राज्यात पुणे जिल्हा बटाटा उत्पादनासाठी देशात विशेष प्रसिद्ध असून, पुण्यापासून 60 किलोमीटवर असणाऱ्या आंबेगावच्या सातगाव पठारावरील बटाट्याने आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. साधारणपणे आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार आणि मावळच्या तळेगाव परिसरात एकत्रिपणे साडे दहा हजार एकरावर बटाटा पीक घेतले जाते. हे बटाटा पीक महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक आहे.

error: Content is protected !!