Poultry Breeds: झुंजेसाठी वापरली जाणारी, चवदार मांसाची ‘असील कोंबडी’; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पोल्ट्रीपालन (Poultry Breeds) म्हटलं की आपल्याला सर्वात अगोदर अंडी उत्पादन आठवणार. परंतु तुम्हाला माहित आहे का, आपल्या भारतात काही कोंबड्या झुंजेसाठी सुद्धा वापरल्या जातात. आंध्रप्रदेश सारख्या राज्यात संक्रांतीला कोंबड्यांची झुंज (Poultry Fighting) लावण्याची प्रथा आहे. यासाठी विशिष्ट जातीचे कोंबडे पाळले जातात. अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण जात आहे ती म्हणजे असील कोंबडी. जाणून घेऊ या कोंबडीच्या जातीविषयी (Poultry Breeds).

असील जातीचे वैशिष्ट्ये (Asil Chicken)

ही भारतातील महत्त्वाची देशी कोंबडी (Poultry Breeds) जात आहे. आक्रमकता, बुद्धिमत्ता, उच्च तग धरण्याची क्षमता, भव्य चाल आणि लढाऊ गुणांसाठी ओळखल्या जातात. पीला (सोनेरी लाल), यार्किन (काळा आणि लाल), नुरी (पांढरा), कागर (काळा), चित्ता (काळा आणि पांढरा), टीकर (तपकिरी) आणि रीझा (हलका लाल) या सर्वांत लोकप्रिय उपजाती आहेत. या जातीचे कोंबडे झुंजेच्या स्पर्धेसाठीच मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

उगमस्थान

असील कोंबडी जातीचे उगमस्थान आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणम आणि विजयनगर जिल्हा असून ही कोंबडी ओडिशा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही आढळते.

शरीर रचना

असील कोंबडीचं तोंड लांब आणि लाटण्याच्या आकाराचं असतं. भरपूर पंख, घनदाट डोळे आणि लांब मान हे या कोंबडीचं वैशिष्ट्ये आहे. या कोंबडीचे पाय सरळ आणि मजबूत असतात. कोंबड्या 3 ते 4 किलो वजनाच्या असतात. तर कोंबड्यांचे वजन 4 ते 5 किलो असते.

प्रजनन आणि उत्पादन

या कोंबड्या 196 दिवसांत लैंगिक परिपक्वता दाखवतात. फलित अंडी क्षमता 66 टक्के तर  उबवणूक क्षमता 63 टक्के असते.

अंडी उत्पादनासाठी या कोंबड्या तितक्या उत्पादनक्षम नाहीत. या कोंबड्या वर्षाकाठी सरासरी 64 अंडी देतात. या कोंबड्या प्रामुख्याने मांसाच्या गुणवत्तेसाठी ओळखले जातात. या कोंबडीचे मांस चवदार असते, मांसात चरबीचे प्रमाण कमी असते त्यामुळे खाण्यासाठी हेल्दी आहे.

error: Content is protected !!