Poultry Business : 200 महिला सांभाळताय पोल्ट्री व्यवसायाची धुरा; शेतकऱ्यांना मोठा फायदा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे सध्या पोल्ट्री व्यवसाय (Poultry Business) चांगलाच चर्चेत आला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उभारून पोल्ट्री उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय महाराष्ट्रात छोटेखानी स्वरूपात शेड उभारून, ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ‘देशी कोंबड्याचे पालन केले जाते. मात्र, पोल्ट्री व्यवसाय कोंबड्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. परिणामी, त्यांच्या वजनात वाढ होण्यात अडचणी निर्माण होतात. तसेच अंडी उत्पादनावर देखील परिणाम होतो. मात्र, हैचिंग होप ग्लोबल इनिशिएटिवच्या माध्यमातून आज महिला स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून पोल्ट्री उत्पादक (Poultry Business) शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे.

दोन जिल्ह्यात अनोखा उपक्रम (Poultry Business Big Benefit To Farmers)

ओडिसा या आदिवासी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय (Poultry Business) बहरला आहे. मात्र, पोल्ट्री व्यवसायाबाबत लोकांमध्ये इतकी जागरूकता नसल्याने, त्यांनी आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. हीच बाब लक्षात कारगिल ही संस्था आणि आंतराष्ट्रीय विकास संघटनेद्वारे हैचिंग होप ग्लोबल इनिशिएटिवच्या माध्यमातून जवळपास क्योंझर आणि मयूरभंज या दोन जिल्ह्यांमध्ये जवळपास 200 महिला नेमणूक करण्यात आली आहे. या 200 महिलांची ‘कृषी पशुवैद्य उद्योजक दीदी’ म्हणून ओळख निर्माण झाली असून, या दोन जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योगाच्या विकासासाठी मोठा फायदा झाला आहे.

कोंबड्यांच्या मृत्युदरात घट

केव दीदी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महिला आज ओडिसा राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात पोल्ट्री उद्योगाचा विकास घडवून आणत आहे. या २०० दीदीपैकी एका असलेल्या सबिता मोहंती सांगतात, यापूर्वी आपल्याकडे पोल्ट्री उद्योगादरम्यान, कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या फेकून दिल्या जात होत्या. मात्र, ही परिस्थिती बदलली असून, गावागावात केव दीदी पोहचत असून, एका कॉलवर शेतकऱ्यांना पोल्ट्री आरोग्य सुविधा मिळत आहे. याशिवाय हैचिंग होप ग्लोबल इनिशिएटिवच्या माध्यमातून, इथल्याच स्थानिक महिलांना रोजगार देखील मिळाला आहे. ज्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत झाली आहे. याशिवाय कोंबड्यांच्या मृत्युदरात देखील मोठी घट झाली आहे.

अंडी उत्पादनात 33 टक्के वाढ

याशिवाय मागील पाच वर्षात ओडिसातील या दोन जिल्ह्यांमध्ये हैचिंग होप पोल्ट्रीच्या स्थापनेनंतर अंडी उत्पादनात जवळपास 33.31 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या उपक्रमामुळे दोन्ही जिल्ह्यातील जवळपास 30,000 छोट्या कोंबडीपालन व्यवसाय करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे. कारण कोंबड्यांना आजार दिसताच शेतकरी ‘केव दीदींना याबाबत कल्पना देतात. ज्यामुळे लसीकरणास मोठी मदत होत आहे

error: Content is protected !!