Poultry Business : 8 दिवसात नशीब फळफळले; पोल्ट्री उत्पादकाची दीड महिन्यात 14 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी शेतीला जोडून अनेक व्यवसाय करत असतात. यात प्रामुख्याने पोल्ट्री व्यवसायाला (Poultry Business) शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. मात्र, मागील काही दिवसांत पोल्ट्री उद्योगाने मोठे चढ-उतार अनुभवले आहे. त्यातच आता कोंबडीच्या चिकन दरात दुपटीने वाढ झाली आहे. ज्यामुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या भाववाढीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या कोंबड्यांची बॅच विक्रीला आली आहे. त्यांना सुगीचे दिवस आले आहे. आज आपण अशाच एका पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्याच्या व्यवसायातील यशाबद्दल (Poultry Business) जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे या शेतकऱ्याचे केवळ 8 दिवसांमध्ये नशीब उजळले आहे.

जोडधंद्याने फळफळले नशीब (Poultry Business Success Story)

विश्वनाथ माणिकराव काकडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील रहिवासी (Poultry Business) आहेत. विश्वनाथ काकडे यांची प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख आहे. त्यांनी शेतीसोबतच पोल्ट्री व्यवसायामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून 2017 मध्ये पोल्ट्री व्यवसाय सुरु केला. गेल्या सात वर्षांपासून ते पोल्ट्री व्यवसाय करत आहे. दीड महिन्यापूर्वी त्यांनी आपली पोल्ट्रीची पिल्लांची बॅच टाकली होती. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात त्यांची बॅच विक्रीला आली. आणि कोंबडीच्या चिकनच्या दरातही दुपटीने वाढ झाली. ज्यामुळे त्यांना नशिबाची साथ मिळून मोठे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.

आठवड्याभरात दरात दुपटीने वाढ

गेले काही दिवस ब्रॉयलर कोंबड्यांच्या चिकनला (जिवंत कोंबडी) 70 ते 80 रुपये प्रति किलो इतका दर मिळत होता. मात्र, आठच दिवसांत राज्यासह देशातील चिकनच्या दरात 150 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ झाली. याच भाववाढीचा फायदा घेत शेतकरी विश्वनाथ काकडे यांनी आपली पोल्ट्रीची बॅच विक्री केली आहे.

किती मिळाले उत्पन्न?

विश्वनाथ काकडे यांनी आतापर्यंत आपल्या सहा टन कोंबड्या विक्री केल्या असून, त्यातून त्यांना 9 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर त्यांनी आपल्या विक्रीला आलेल्या आणखी 4 टन कोंबड्यांचा 150 रुपये प्रति किलोने विक्री करार केला आहे. ज्यातून त्यांना 5 लाख 40 हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. अर्थात दीड महिन्यात त्यांना आपल्या बॅचमधून ब्रॉयलर कोंबड्यांचे विक्रमी 10 टन उत्पादन मिळाले असून, केवळ दीड महिन्यात 14 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांना प्रथमच इतके विक्रमी उत्पन्न मिळाले असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!