Poultry Care in Winter: थंडीत कोंबड्यांची विशेष काळजी घेताय ना?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : थंडीच्या दिवसात कोंबड्याची विशेष काळजी (Poultry Care in Winter) घ्यावी लागते. कारण त्यांच्या शरीराचे तापमान बाकीच्या जनावरांच्या तुलनेत थोडे जास्त असते. या काळात कोंबड्याच्या शरीराचे तापमान टिकवून ठेवले नाही तर त्यांच्या प्रजनन व अंडी उबवण क्षमतेवर परिणाम होऊन अंड्यांचे उत्पादन कमी होते. त्यामुळे कमी तापमानाच्या काळात कोंबड्यांचे आहार तसेच शेडमधील व्यवस्थापनाची खालील प्रमाणे काळजी (Poultry Care in Winter) घ्यावी.

आहार व्यवस्थापन (Food Management In Winter)

 1. कोंबड्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी त्यांना संतुलित आहार द्यावा.
 2. शेडमध्ये फीडर्सची संख्या वाढवावी जेणेकरून त्यांना दिवसभर मुबलक खाद्य मिळेल
 3. शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी कोंबड्याना उत्तम दर्जाचे उर्जायुक्त खाद्य द्यावे.
 4. कमी तापमानाच्या काळात कोंबड्याना जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते.
 5. खाद्य बनवताना ऊर्जा असणाऱ्या स्रोतांचा प्रामुख्याने स्निग्ध पदार्थांचा वापर करावा
 6. हिवाळ्यामध्ये कोंबड्या खूप कमी पाणी पितात. त्यांची पाणी पिण्याची क्षमता वाढविण्यासाठी त्यांना ताजे व स्वच्छ पाणी पुरवावे. पाणी खूप थंड असेल तर गरम पाणी मिसळून घ्यावे (Poultry Care in Winter) .
 7. एकूण वाटरर्स पैकी काही वाटरर्स मध्ये चव येण्याकरिता ग्लुकोज,साखर, टरबुज- खरबूजचे पाणी टाकावे जेणेकरून कोंबड्या पाणी पिणार आणि त्यांची पचनक्रिया अगदी सुरळीत राहील.

शेडचे व्यवस्थापन (Shed Management)

 • शेड तयार करताना त्याची दिशा नेहमी पूर्व-पश्चिम ठेवावी त्यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश शेडमध्ये येण्यास मदत होते.
 • शेडच्या ज्या भागातून थंड हवा येते अशा ठिकाणची पूर्ण जागा पडद्यांनी बंद करून घ्यावी. दुसऱ्या दिवशी सकाळी पडदे उघडून घ्यावेत जेणेकरून सकाळी सूर्यप्रकाशाची किरणे शेडमध्ये येतील व कोंबड्याना उब मिळेल.
 • शेडमध्ये चांगल्या प्रकारचे लीटर वापरावे ते नेहमी स्वच्छ व कोरडे असावे. लीटर मटेरियल पासून सुद्धा कोंबड्याना उब मिळते.
 • शेडमधील हवा खेळती राहण्यासाठी भिंती कमी उंचीच्या व वर जाळी बसवलेली असावी. 
 • प्रदूषित हवा बाहेर फेकण्यासाठी एक्झॉस्ट फॅनची व्यवस्था करावी.
 • शेडभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. बदलत्या हवामानानुसार व्यवस्थापनामध्ये किंवा शेडमध्ये योग्य ते बदल सुरुवातीपासूनच करावेत, अचानक कुठलेही बदल करू नये.
 • शेडमधील हवा खेळती नसेल तर कोंबड्यांचा विष्टेतून तयार होणाऱ्या अमोनिया वायूमुळे श्वसन विषयी समस्या निर्माण होतात.त्यामुळे कोंबड्याना ताप येणे,खोकलने ,छातीत दुखणे, श्वसनास त्रास होणे, तोंड पसरून श्वास घेणे, भूक मंदावणे, घरघर असा आवाज येणे अश्या बऱ्याच समस्या उद्भवतात, योग्य ते नियोजन करून शेड स्वच्छ ठेवावे व योग्य ते नियोजन करावे (Poultry Care in Winter).  
error: Content is protected !!