Poultry Export : पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यात वाढीसाठी केंद्राची बैठक; ‘पहा’ काय झाला निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पोल्ट्री (Poultry Export) व्यवसाय करतात. अन्नधान्यांच्या बरोबरीने मांस आणि अंडी यांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. सध्यस्थितीमध्ये देशातील अन्नधान्य उत्पादनात वार्षिक 1.5 ते 2 टक्क्यांनी वाढ होत आहे. तर पोल्ट्री क्षेत्रातील मांस आणि अंडी उत्पादनात वार्षिक 8 ते 10 टक्क्यांनी वाढ होत आहे. भारतीय पोल्ट्री उद्योगाने जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यात वाढीसाठी केंद्रीय पशुपालन आणि दुग्धविकास विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे विभागाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी म्हटले आहे. पोल्ट्री (Poultry Export) आणि दुग्धविकास विभागाच्या झालेल्या बैठकीत त्यांनी देशभरातील पोल्ट्री उद्योजकांकडून निर्यातवाढीसाठी सूचना मागवल्या आहेत.

उत्पादनांविषयी भ्रम नाहीसा (Poultry Export Products Centers Meeting)

या बैठकीदरम्यान अलका उपाध्याय यांनी पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यात वाढीसाठी देशातील 33 पोल्ट्री क्षेत्रांमध्ये ‘एवियन इन्फ्लूएंजा’ या रोगापासून मुक्त पक्षी अशी घोषणा करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेलाही याबाबत सूचित करण्यात आले आहे. याशिवाय मागील चार वर्षांपासून कोरोना काळात लोकांच्या मनात पोल्ट्री उत्पादनांविषयी जो भ्रम निर्माण झाला होता. त्याला दूर करण्याचे काम विभागाकडून आजतायागत सुरु आहे. त्यामुळे आता देशातून बिनदिक्कतपणे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उत्पन्नांची निर्यात होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पोल्ट्री उद्योगातील संघटना, पोल्ट्री उत्पादक शेतकरी आणि उद्योगातील जाणकारांनी निर्यातवाढीसाठी असलेल्या आपल्या सूचना विभागाकडे पाठवाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

पोल्ट्री फेडरेशन ऑफ इडियाच्या म्हणण्यानुसार, या बैठकीला देशातील पोल्ट्री (Poultry Export) उद्योगातील अनेक महत्वाच्या लोकांना केंद्र सरकारच्या पशुपालन आणि दुग्धविकास विभागाकडून आमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत उद्योगासाठी सरकारकडून निर्यातवाढीचे अनुकूल पावले उचलीत जात असल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकार पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यात वाढीसाठी काम करत असेल तर उद्योगाच्या आर्थिक भरभराटीसाठी ही निश्चितच चांगली बाब आहे. असे फेडरेशन बैठकीदरम्यान म्हटले आहे.

स्वस्त पोल्ट्री फीडची मागणी

पोल्ट्री फेडरेशन ऑफ इडियाने या बैठकीत विभागाकडे आपल्या काही मागणी ठेवल्या आहे. यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्वस्त मांस आणि अंड्याची विक्री करण्यासाठी सरकारने पोल्ट्री उद्योगासाठी स्वस्त पोल्ट्री फीड उपलब्ध करून द्यावे. मका आणि सोयाबीनच्या कमतरेमुळे पोल्ट्री उद्योगाला फीडसाठी मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. अमेरिका आणि ब्राझील या देशांच्या तुलनेत आपल्याकडे पोल्ट्री खाद्याचे दर अधिक आहे. पोल्ट्री फेडरेशनच्या या मागण्यांचे लवकरच निराकरण करण्यात येईल, असे या बैठकीत केंद्रीय पशुपालन आणि दुग्धविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!