हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात मासांहार करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यातूनच देशात वेगवेगळ्या भागांमध्ये पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) देखील चांगलाच बहरला असून, कोंबड्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळतात. मात्र एखाद्या कोंबड्याची किंमत ही एक लाख रुपयांहून अधिक आहे. हे कधी तुम्ही ऐकलंय का? मात्र व्हिएतनाम या देशातील ‘डॉन्ग टाओ’ प्रजातीच्या एका कोंबड्याची किंमत ही एक लाखांहून अधिक आहे. भारतात प्रामुख्याने सर्वात महाग असलेल्या कडकनाथ कोंबड्याचे चिकन 200 रुपये प्रति किलोपर्यंत मिळून जाते. परंतु ‘डॉन्ग टाओ’ या कोंबड्याला एक लाखाहून अधिकचा भाव मिळत असल्याने, तो जगातील सर्वात महाग कोंबडा (Poultry Farming) मानला जातो.
‘ड्रॅगन चिकन’ नावाने ओळख (Poultry Farming Dong Tao’ Chickens)
‘डॉन्ग टाओ’ कोंबड्याची किंमत ऐकून तुमच्याही तोंडचे पाणी पळाले असेल. विचारात पडला असाल इतका महागडा कोंबडा कुठे असतो काय? मात्र व्हिएतनाम या देशामध्ये पाळला जाणारा हा कोंबडा ‘ड्रॅगन चिकन’ नावाने ओळखला जातो. व्हिएतनामची राजधानी हनोई या ठिकाणी त्याच्या पालनाचा व्यवसाय (Poultry Farming) सर्वप्रथम सुरु झाला. त्याची मागणी वाढू लागल्याने अनेक देशांमध्ये पोल्ट्री व्यावसायिक ‘डॉन्ग टाओ’चे पालन करत आहे. भारतात सध्या तरी या कोंबड्याच्या पालनाबाबत लोकांमध्ये माहितीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. अनेकांना या कोंबड्याबद्दल माहिती नाही. त्यामुळे तो भारतात कोठेही आढळून येत नाही.
किती असते किंमत?
व्हिएतनाममध्ये एका पोल्ट्री व्यवसायीकडे ‘डॉन्ग टाओ’ या प्रजातीचे काही कोंबडे आढळून आले होते. या कोंबड्याची विशेषतः म्हणजे त्याचे पाय हे सामान्य कोंबड्यापेक्षा खूप जाड असतात. त्यांचा रंग लाल असतो, जो सामान्य कोंबड्यांमध्ये पांढरा असतो. सध्या या कोंबड्याची किंमत 1,65,000 रुपये इतकी आहे. व्हिएतनाममध्ये या कोंबड्यांची संख्या सध्यस्थितीत खूपच कमी आहे. मात्र, त्या ठिकाणी ‘लूनर न्यू ईयर’ या मुख्य सणाला ‘डॉन्ग टाओ’ कोंबड्याच्या चिकनला मोठी मागणी असते. इतके महागडे चिकन असूनही, ग्राहक त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. परिणामी ‘डॉन्ग टाओ’ पालनातून त्या ठिकाणी पोल्ट्री व्यवसाय बहरतो आहे.
काय आहे विशेषतः?
‘डॉन्ग टाओ’ या कोंबड्याला सामान्य कोंबड्यांपेक्षा अधिक खाद्य लागत असून, तो खूप वजनदार असतो. सामान्यतः त्याचे वजन 10 किलोपर्यंत असते. याशिवाय त्याच्या चिकनमध्ये फॅटचे प्रमाण खूपच कमी असते. ज्यामुळे तो आरोग्याच्या दृष्टीने जागरूक असणाऱ्या ग्राहकांच्या पसंतीस पडतो. याशिवाय इतर कोंबड्यांच्या तुलनेत ‘डॉन्ग टाओ’ कोंबड्याच्या मांसामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. ज्यांना प्रथिनांचे सेवन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हालाही ‘डॉन्ग टाओ’च्या पालनातून पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला त्याची पिल्ले व्हिएतनाममधून आणावी लागतील. यानंतर, सामान्य कोंबड्यांप्रमाणे, आपण कोंबडी फार्ममध्ये त्याचे संगोपन सुरू करू शकता.