Poultry Farming : पोल्ट्री फार्म पूर्व-पश्चिम दिशेतच का उभारतात? वाचा.. आयसीएआरची नियमावली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) चांगलाच बहरला आहे. मात्र पोल्ट्री व्यवसायात कोंबड्यांचे आजारपण, रोग आणि त्यावर नियंत्रण मिळवणे, ही पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांसमोर सर्वात समस्या असते. ज्यामुळे पोल्ट्री व्यवसायात नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहून, शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायातून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते. याच पार्श्वभूमीवर आज आपण भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) पोल्ट्री व्यवसायाबाबतच्या काही मार्गदर्शक सूचनांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला पोल्ट्री व्यवसायाचे (Poultry Farming) नियमन करण्यास मदत होणार आहे.

अशी करा पोल्ट्रीची उभारणी (Poultry Farming ICAR Tips)

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आईसीएआर) आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, पोल्ट्री व्यवसायामध्ये (Poultry Farming) सुरुवातीला पोल्ट्री उभारताना त्याची दिशा ही पूर्व-पश्चिम दिशेत असावी लागते. यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कमीत-कमी सूर्यप्रकाश हा पोल्ट्री फार्ममध्ये पडेल. ज्यामुळे पक्षांना तीव्र उन्हामुळे कोणतीही इजा होणार नाही. इतकेच नाही तर आपण पोल्ट्री उभारताना दोन शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीमध्ये किमान एक किलोमीटर अंतर असायला हवे. ज्यामुळे साथ रोगांच्या प्रादुर्भावातून होणारे आर्थिक नुकसान टळण्यास मदत होते.

वेळोवेळी लसीकरण गरजेचे

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आईसीएआर) म्हटले आहे की, कोंबड्यांना होणाऱ्या रोगकारक जंतूंचा प्रसार एका पोल्ट्री फार्ममध्ये प्रवेश करण्यापासून किंवा मग एका पोल्ट्री फार्ममधून, दुसऱ्या पोल्ट्री फार्ममध्ये (Poultry Farming) पसरण्यापासून रोखण्यासाठी बायो-सेक्युरिटी हा सर्वात चांगला पर्याय आहे. कोंबड्यांना वेळोवेळी लसीकरण करणे खूप गरजेचे आहे. ज्यामुळे घातक रोगांपासून पक्ष्यांना वाचवण्यासाठी लसीकरणामुळे मोठी मदत होते.

पक्ष्यांमध्ये रोग पसरण्याची कारणे

  • कोंबड्यांमध्ये बहुतेक रोग हे एका पोल्ट्री फार्म मधून, दुसऱ्या दुसऱ्या पोल्ट्रीमध्ये कामगार, उपकरणे आणि वाहने यांच्या येण्या-जाण्यामुळे पसरतात.
  • कोंबड्यांना श्वसनाशी संबंधित आजार हे प्रामुख्याने हवेतील धुळी कणांमुळे पसरतात.
  • हॅचरीमधून अर्थात कोंबड्यांच्या अंडी उबवण्याच्या जागेतूनही रोगराई पसरण्याची शक्यता असते.
  • उंदीर, वन्यप्राणी आणि भटक्या पक्ष्यांमुळेही संसर्गजन्य रोग पसरतात.
  • माश्या, डास इत्यादी बाह्य परजीवी रोग पसरवण्याचे काम करतात.
  • दूषित धान्य, धान्याच्या पिशव्या, वाहने आणि पोल्ट्री फार्म बेडिंग जसे की मधाचे भुसे, लाकडाचा भुसा इत्यादी रोग पसरवण्याचे माध्यम आहेत.
  • संसर्गजन्य रोगांची लागण झालेली कोंबडी अनेक रोगांचे वाहक म्हणून काम करते. त्यामुळे वेळीच असे पक्षी दूर करावेत.

रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय

  • पोल्ट्री फार्म बांधताना त्याची दिशा पूर्वेकडून-पश्चिमेकडे असावी. यामुळे तीव्र सूर्यप्रकाशाच्या उष्णतेपासून पक्षांचा बचाव करण्यास मदत होते.
  • दोन शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये किमान 1 किमी अंतर असावे. तर हॅचरी युनिट अर्थात अंडी उबवण्याची जागा आणि अन्य कोंबड्यांचे व्यवस्था वेगवेगळी असावी.
  • पोल्ट्री फार्म हा काँक्रीटचा असावा. तो जमिनीपासून किमान तीन फूट उंच असावा. जेणेकरून उंदरांचा प्रादुर्भाव होत नाही. पोल्ट्री फार्म भोवती कोणतेही झाडे नसावीत.
  • झाडांमुळे इतर पक्षी पोल्ट्रीजवळ येऊन रोगराईला आमंत्रण मिळते.
  • पोल्ट्री फार्मच्या प्रवेशद्वारावर आणि प्रत्येक पोल्ट्री हाऊसच्या प्रवेशद्वारावर फूट बाथ (जंतुनाशक द्रावण) असणे आवश्यक आहे.
  • ज्यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये जाताना पायांपासून संसर्गजन्य रोग, कोंबड्यांमध्ये पसरणार नाही.
error: Content is protected !!