Poultry Farming : पोल्ट्रीसाठी किती टक्के व्याजदराने मिळते कर्ज? वाचा 7 बँकांची टक्केवारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीला जोडून अनेक व्यवसाय (Poultry Farming) करायचे असतात. मात्र, भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय सुरु करण्यात अनेकांना अडचणी येतात. मात्र शेतकऱ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध झाल्यास, पोल्ट्री व्यवसाय सुरु करणे फारसे अवघड नाही. त्यामुळे आता तुम्ही एखाद्या बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन पोल्ट्री व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल. तर आज आपण पोल्ट्री व्यवसायाठीचे (Poultry Farming) बँक कर्ज काय आहे? देशातील कोणती बँक, किती टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करून देते? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

पोल्ट्री व्यवसायासाठीचे कर्ज? (Poultry Farming Interest Rate Of Bank Loan)

पोल्ट्री फार्मसाठीचे कर्ज हे ‘व्यवसाय कर्ज’ स्वरूपात मोडते. देशातील सर्व खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देतात. हे कर्ज देशभरातील शहरी, ग्रामीण भागातील व्यक्ती, सूक्ष्म व लघु उद्योग किंवा मग अन्य व्यवसाय करणाऱ्यांना देखील उपलब्ध करून दिले जाते. पोल्ट्री व्यवसायासाठीचे कर्ज हे विविध बँका आणि कर्ज संस्थांद्वारे विविध व्याजदर आणि सुलभ कर्ज भरणा पर्यायांसह उपलब्ध करून दिलेले असते. हे कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही पदवी किंवा विशेष शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नसते. शेतकरी थोड्याफार भांडवलात आणि मेहनतीमध्ये पोल्ट्री व्यवसाय सुरु करू शकतात.

विविध बँकांचे व्याजदर

सध्याच्या घडीला देशातील सर्वच बँका पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध देतात. या बँकांपैकी काही प्रमुख बँका खालीलप्रमाणे आहेत. ज्या बँकांच्या जवळच्या शाखांमध्ये जाऊन तुम्ही पोल्ट्री व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करू शकतात. एक्सिस बँक 10.49 टक्के व्याजदर, एचडीएफसी बँक 10.5 टक्के व्याजदर, आयडीएफसी फर्स्ट बँक 10.99 टक्के, कोटक महिंद्रा बँक 10.99 टक्के, बजाज फिनसर्व बँक 11.00 टक्के, टाटा कॅपिटल बँक 10.99 टक्के व्याजदर, नियोग्रोथ फायनान्स बँक 19 टक्के दराने पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देते. पोल्ट्री व्यवसायासाठी पोल्ट्री शेड, पोल्ट्री फीड आणि इतर आवश्यक सुविधांसाठी तुम्हांला हे कर्ज उपलब्ध होणार आहे.

किती मिळते अनुदान?

शेतकरी आपल्या आवश्यकतेनुसार कर्ज मिळवण्यासाठी संबंधित बँकांकडे अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) सुरु करण्यासाठी अनुदान देखील उपलब्ध करून दिले जाते. समजा तुम्हांला एक लाख रुपयांमध्ये व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर सरकार तुम्हाला 25 टक्के अनुदान देते. अर्थात तुम्हांला सर्वसाधारण प्रवर्गासाठी 25000 रुपये अनुदान तर एससी/एसटी प्रवर्गासाठी 35 टक्के अर्थात 35000 रुपये अनुदान मिळते.

error: Content is protected !!