Poultry Farming : पोल्ट्री व्यवसाय टाकायचाय, गिनी फाउल पक्षी पाळा; वाचा… संपूर्ण माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दशकांपासून देशातील पोल्ट्री उद्योगाचा (Poultry Farming) मोठा विकास झाला आहे. देशात पोल्ट्री उद्योगाअंतर्गत लेयर फार्मिंगच्या माध्यमातून ब्रॉयलर कोंबडी, बदक, बटेर, टर्की आणि गिनी फाउल या पक्षांच्या मदतीने अंडी उत्पादन केले जात आहे. मात्र आता तुम्ही पोल्ट्री उद्योगात नव्याने येण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही गिनी फाउल या पक्षांच्या माध्यमातून अंडी उत्पादनातून चांगली कमाई करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशा पद्धतीने केला जातो गिनी फाउल किंवा तीतर या पक्षांच्या (Poultry Farming) पालनाचा व्यवसाय…

गिनी फाउल/तीतर पक्षाबद्दल (Poultry Farming Guinea Fowl Birds)

गिनी फाउल हा पक्षी कोंबडीपेक्षा थोडा मोठा, मध्यम आकाराचा असतो. हा पक्षी मूळचा आफ्रिकेतील असून, संपूर्ण आफ्रिका आणि युरोप खंडातही या पक्षाच्या मदतीने पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) केला जातो. अलीकडे भारतातही या पक्षाच्या माध्यमातून पोल्ट्री उद्योग मोठ्या प्रमाणात बहराला आहे. गिनी फाउल या पक्षाचा मांस, अंडी अशा दोन्ही गोष्टींसाठी केला जातो. भारतीय वातावरण आणि हवामानात देखील हा पक्षी उत्तमरित्या वाढतो. विशेष म्हणजे या पक्षाच्या माध्यमातून व्यवसाय करताना होणार उत्पादन खर्च हा फारच कमी असतो. त्यामुळे ब्रॉयलर कोंबड्यांसोबतच गिनी फाउल पालनास मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

या आहेत प्रजाती

केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, गिनी फाउल अर्थात तीतर पक्षी ब्रॉयलर कोंबड्यांच्या तुलनेत रोगांच्या प्रादुर्भावास खूपच कमी प्रमाणात बळी पडतो. त्यामुळे या पक्षांच्या पालनादरम्यान लसींवरील खर्च देखील नगण्य असतो. त्यामुळे पोल्ट्री उद्योगासाठी तीतर पालन एक चांगला पर्याय म्हणून पाहिला जात आहे. भारतात प्रामुख्याने कादंबरी, चितांबरी आणि श्वेतांबरी या तीन प्रजातीचे गिनी फाउल पक्षी पाळले जातात. हे पक्षी रंगाने सफेद, भुरकट आणि काळ्या रंगाचे असतात.

प्रति पक्षी किती अंडी?

गिनी फाउल या पक्षांच्या पालनादरम्यान औषधांवर होणारा खर्च नसतो. सुदृढ असणारा हा पक्षी कोणत्याही वातावरणात तग धरून राहून शकतो. गिनी फाउल हा पक्षी सर्वभक्षी असून, तो बिया, फळे, कीटक आणि लहान उंदीर यासह विविध प्रकारचे अन्नधान्य (फीड) खातात. त्यामुळे ब्रॉयलर कोंबडीप्रमाणेच त्याचा आहाराचा खर्च असतो. हा पक्षी जवळपास 230 ते 250 दिवसांचा झाल्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करतो. यातील मादी पक्षी मासिक 8 ते 20 अंडी घालते, जी नर आणि मादी दोघांद्वारे अंदाजे 26 ते 28 दिवस उबविली जाते.

मांसाला मिळतो अधिक दर

गिनी फाउल हा वेगाने वाढणारा पक्षी असून, 8 आठवड्यांमध्ये त्याचे वजन साधारणपणे 500 ग्रॅम आणि 12 आठवड्यांमध्ये 1 किलोपर्यंत वाढते. या पक्षाचे मांस हे कोंबडीच्या मांसापेक्षा महाग असते. आज देशभारत गिनी फाउल पक्षाच्या मांसाची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून छोटेखानी स्वरूपात गिनी फाउल पक्षांचे पालन शेतकऱ्यांनी केल्यास अर्थार्जनाचा एक चांगला पर्याय त्यांना उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय मोठ्या प्रमाणात शेड उभारणी करूनही गिनी फाउल पालन केले जाऊ शकते.

error: Content is protected !!