Poultry Farming : ‘रेनबो रुस्टर’ प्रजातीची कोंबडी; अंडी, मांस उत्पादनासाठी सर्वोत्तम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोंबडीपालन व्यवसाय (Poultry Farming) करतात. यात काही शेतकरी हे ब्रॉयलर कोंबड्यांच्या माध्यमातून पोल्ट्री (Poultry) उभारतात. तर काही शेतकरी हे ग्रामीण भागातील चांगल्या जातींच्या माध्यमातून गावठी कोंबड्यांचे पालन करतात. विशेष म्हणजे या ग्रामीण भागातील कोंबड्यांकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसते. तसेच त्यांच्या अंड्यांना (Eggs) मिळणारा दरही अधिक असतो. ग्रामीण भागात अनेक शेतकरी हे कोंबडीपालन व्यवसाय करण्याचा विचारात असतात. मात्र, कोणत्या प्रजातीच्या कोंबड्यांची निवड करावी? असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण भारतामध्ये सर्वाधिक पाळल्या जाणाऱ्या ‘रेनबो रुस्टर’ (Rainbow rooster hen) या प्रजातीच्या कोंबडीबाबत (Poultry Farming) जाणून घेणार आहोत.

वर्षभरात किती अंडी मिळतात? (Poultry Farming Rainbow Rooster Hen)

पोल्ट्री व्यवसायाच्या (Poultry Farming) माध्यमातून अंडी उत्पादनासाठी ‘रेनबो रुस्टर’ (Rainbow rooster hen) ही सर्वोत्तम प्रजाती मानली जाते. विशेष म्हणजे अंडी उत्पादनासोबतच कोंबडीची ही जात मांस उत्पादनासाठी वजनामध्ये देखील उत्तम ठरते. ‘रेनबो रुस्टर’ प्रजातीच्या पूर्ण वाढ झालेल्या एका कोंबडीचे वजन हे 2.4 ते 2.6 किलो इतके असते. या जातीची कोंबडी ही वर्षभरात सरासरी 120 अंडी देते. अन्य कोणत्याही लोकल जातीच्या तुलनेत कोंबडीची ही जात खूपच परिपक्व असते. एखादी स्थानिक कोंबडी 1.2 ते 1.5 किलोपर्यंत वाढते. तर ती वर्षाला 50 ते 60 अंडी देते. त्या तुलनेत ‘रेनबो रुस्टर’ ही कोंबडीची जात दुपटीने अंडी आणि मांस उत्पादन शेतकऱ्यांना मिळवून देते.

मिळते दुहेरी उत्पन्न

पशुतज्ज्ञांच्या माहितीनुसार, पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) व्यवयसायात उतरताना कोंबडीच्या जात निवडीवर अधिक भर देणे गरजेचे असते. ग्रामीण भागात अनेक शेतकरी छोटेखानी शेड उभारून, त्या माध्यमातून अंडी उत्पादन घेत असतात. यात प्रामुख्याने शेतकरी त्या-त्या भागातील स्थानिक कोंबड्यांच्या जातींची निवड करतात. मात्र, शेतकऱ्यांना अधिक अंडी आणि मांस उत्पादन मिळावे. यासाठी देशभरात ‘रेनबो रुस्टर’ या जातीच्या आधुनिक प्रजातीच्या कोंबड्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला. ज्यामुळे शेतकऱ्यांना छोटेखानी पोल्ट्री उभारून, दुहेरी उत्पन्न मिळण्यास फायदा झाला आहे.

वनराज कोंबडीही देते अधिक अंडी

विशेष म्हणजे ‘रेनबो रुस्टर’ ही कोंबडीची आधुनिक प्रजाती असून, तिच्यापासून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळतो. रेनबो रुस्‍टर प्रजाती स्थानिक प्रजातीपेक्षा अधिक अंडी देते. तर केवळ सहा महिन्यात ती 1.5 किलोपर्यंत वजन देते. तर वनराज जातीची कोंबडी ही वर्षभरात 150 अंडी देण्यास सक्षम असते. अर्थात शेतकऱ्यांना स्थानिक प्रजातीच्या तुलनेत अंडी उत्पादनासाठी ‘रेनबो रुस्टर’ आणि वनराज ही प्रजाती उत्तम ठरते.

error: Content is protected !!