Poultry Farming : ‘र्‍होड आयलँड रेड’ जातीच्या कोंबड्या पाळा; अंडी-चिकन व्यवसायात होईल दुप्पट नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी अधिक नफा मिळविण्यासाठी शेतीसोबतच इतर व्यवसाय (Poultry Farming) करत असतात. जेणेकरून त्यांना शेतीतून दुहेरी आर्थिक उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा असते. आजकाल ग्रामीण भागात शेतकरी कुक्कुटपालन व्यवसायाचा अवलंब करत आहेत. विशेष म्हणजे चांगल्या जातीच्या कोंबड्यांचे संगोपन करून, शेतकरी वर्षानुवर्षे चांगले पैसे कमवू शकतात. त्यामुळे आता तुम्हीही कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry Farming) करायचा असेल तर ‘र्‍होड आयलँड रेड’ कोंबडी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

माहिती असणे आवश्यक (Poultry Farming RIR Hens)

अनेक शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायामध्ये (Poultry Farming) उतरून अधिकचा नफा मिळवण्याची अपेक्षा असते. मात्र, त्यासाठीचे भांडवल, सर्व खर्च, उत्पन्न आणि चांगल्या जातीची कोंबड्यांची माहिती नसल्याने त्यांना त्यातून नफा मिळत नाही. जर तुम्हालाही चांगल्या जातीच्या कोंबड्यांचे संगोपन करून फायदा मिळवायचा असेल. तर तुम्ही नक्कीच ‘र्‍होड आयलँड रेड’ जातीच्या कोंबड्या पाळू शकतात.

वर्षाला 290 ते 300 अंडी

‘र्‍होड आयलँड रेड’ ही कोंबडी ऑस्ट्रेलियन जातीची आहे. ज्याची अंडी उत्पादन क्षमता प्रति वर्ष 290 ते 300 अंडी आहे. याउलट देशी जातीची कोंबडी वर्षाला 100 ते 150 अंडी देते. आरआयआर ही अंडी उत्पादनासाठी सर्वोत्तम जात मानली जाते. या जातीची कोंबडीची पिल्ले अंडी घालण्यासाठी फार लवकर विकसित होतात. या जातीची कोंबडी तुम्ही घराच्या मागेही सहज पाळू शकतात. या जातीच्या कोंबडीची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली असते. ज्यामध्ये आजारी पडण्याची शक्यता खूपच कमी असते.

बाजारपेठेत सर्वाधिक मागणी

र्‍होड आयलँड रेड कोंबडी एका वर्षात सुमारे 300 अंडी देते. ज्याची किंमत भारतीय बाजारपेठेत खूप जास्त आहे. तसे पाहिले तर या जातीच्या कोंबडीचे अंडी 10 ते 12 रुपयांना प्रति मग विकले जाते. दुसरीकडे, इतर जातींच्या कोंबडीच्या अंड्याची किंमत सात ते आठ रुपयांपर्यंत आहे. त्याच वेळी त्याच्या मांसाची किंमत देखील बाजारात सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आरआयआर जातीच्या कोंबडीचे पालन करून चांगला नफा मिळवू शकतात.

error: Content is protected !!