Poultry Farming Scheme In Maharashtra: महाराष्ट्र सरकारची ‘कुक्कुट पालन योजना’; जाणून घ्या सविस्तर माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील नागरिकांना कुक्कुटपालन (Poultry Farming Scheme In Maharashtra) करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी  कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे कुक्कुटपालन (Poultry Farming) योजना सुरू करण्यात आलेली आहे. जाणून घेऊ या योजनेबद्दल (Poultry Farming Scheme In Maharashtra) सविस्तर माहिती.

कुकुट पालन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? (Poultry Farming Scheme In Maharashtra)

  • कुक्कुटपालन उद्योग स्वतः सुरू करण्यास इच्छुक बेरोजगार युवकांना 75% पर्यंत आर्थिक अनुदान उपलब्ध करून देणे
  • राज्यामधील बेरोजगारांची संख्या कमी करणे
  • राज्यामध्ये पशुपालन उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देणे
  • शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन उद्योग सुरू करायला चालना देणे
  • राज्याचा औद्योगिक विकास करणे
  • बेरोजगारांना कुक्कुटपालन उद्योगाकडे आकर्षित करणे

कुकुट पालन योजनेची वैशिष्ट्ये

  • राज्यामधील पशुसंवर्धन विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • कुक्कुट पालन या योजनेची अंमलबजावणी अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद हे राहणार आहे.
  • स्वतःच्या व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही योजना एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
  • या योजने करता अर्ज प्रक्रिया ही खूप सोपी ठेवण्यात आलेली आहे.
  • या योजनेबद्दल दिली जाणारी अनुदानाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या साह्याने जमा करण्यात येणार आहे.

अनुदान आणि लाभ (Poultry Farming Scheme In Maharashtra)

  • या योजनेच्या माध्यमातून पक्षी संगमपणा करता पक्षीगृह व इतर मूलभूत सुविधा उभारणी करता सर्वसाधारण योजनेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रति युनिट 2 लाख 25 हजार रुपये प्रकल्प खर्चाच्या 50% म्हणजेच 1,12,500 रुपये मर्यादेत
  • अनुसुचित जाती उपयोजना (विघयो) व आदिवासी उपयोजनेतून अनुक्रमे अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 75% म्हणजेच 1,68,750/- रुपये मर्यादेपर्यंत शासकीय अनुदान अनुज्ञेय देय राहील.
  • प्रकल्पासाठी शासकीय अनुदानाव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील लाभाथ्यांनी उर्वरीत 50% रक्कम म्हणजेच 1,12,500/- रुपये व अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्याने 25% रक्कम म्हणजेच 56,250/- रुपये स्वतः अथवा बँकेकडून/वित्तीय संस्थाकडून कर्ज घेऊन उभारायची आहे.
  • बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी किमान 10% स्वहिस्सा व उर्वरीत 40% बँकेचे कर्ज त्याचप्रमाणे अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांसाठी किमान 5% स्वहिस्सा व उर्वरीत 20% बँकेचे कर्ज याप्रमाणे रक्कम उभारायची आहे.
  • 50 टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी गट वाटपासाठी निर्धारित केलेल्या 10,840 रकमेच्या 50 टक्के रक्कम म्हणजेच 5420/- रुपये आणि 100 एक दिवसीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटपासाठी निर्धारित केलेल्या 29,500 रकमेच्या 50 टक्के रक्कम म्हणजेच 14750/- रुपये लाभार्थी स्वहिस्सा राहील.

कुक्कुट पालन योजना अंतर्गत आवश्यक पात्रता (Poultry Farming Scheme In Maharashtra)

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला लाभार्थी निवडण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल.
  • योजना सुरु झाल्यापासून अर्ज स्वीकारण्यासाठी 30 ते 45 दिवसांची मुदत देण्यात येईल व मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सदर अर्जातील वैद्यता ही चालू आर्थिक वर्षातील उपलब्ध तरतुदीच्या मर्यादेच्या अधीन असेल तसेच कोणत्याही स्वरूपात सदरील अर्ज पुढील आर्थिक वर्षासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • योजनेअंतर्गत निर्धारित रकमेपेक्षा जास्त किंमत झाल्यास सदरचा वाढीव खर्च लाभार्थ्याने स्वतः करणे अपेक्षित आहे.
  • एकदिवसीय पिले / तलंगा गट वाटप करताना विशेषतः मरेक्स, राणीखेत आर.डी. आणि देवी रोगांवरील लसीकरण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत करून घेणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत एकदा लाभार्थ्याची निवड झाल्यावर त्या लाभार्थ्याच्या या योजनेकरिता किमान पुढील 5 वर्षे पुनःश्‍च विचार करण्यात येणार नाही.
  • योजनेअंतर्गत पिल्लांच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, उर्वरित खात्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी इत्यादी वरील खर्च लाभार्थ्याला करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, जमिनीचा 7/12 व 8अ, पासपोर्ट आकाराचे फोटो, बँक खात्याचा तपशील, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, शपथपत्र, पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र

अर्ज कसे करायचे?

  • अर्जदाराने आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जाऊन कुकुट पालन योजनेचा अर्ज घ्यावा.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी व सदर अर्ज कार्यालयात जमा करावा

जिल्हा अधिकारी तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची छाननी करून तुम्ही योजनेअंतर्गत (Poultry Farming Scheme In Maharashtra) पात्र असल्यास लाभाचे वितरण करण्यात येईल.

error: Content is protected !!